आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना‍शिकमध्ये गारासह मुसळधार पाऊस; द्राक्ष उत्पादकांचे नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरासह जिल्ह्यात सोमवारी दुपारी साडे तीनच्या गारांसह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नागरीकांना दिलासा मिळाला असला तरी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे कोट्यवंधीचे नुकसान झाले आहे. तसेच गव्हाचेही नुकसान झाले आहे. ओझर, पिंपळगाव येथेही जोरदार पाऊस झाला. येत्या 48 तासांत राज्यातील काही भागात पाऊस पडण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

या अकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा, कांदा तसेच गव्हालाही या गाररपिटीचा फटका बसला आहे. उत्पादनात मोठी घट होणार असल्याचीही भीती वर्तवली जात आहे. तसेच जळगावसह भुसावळातही मुसळधार पावसाचे वृत्त आहे. केळी पिकाला या पावसाच फटका बसला आहे.

कर्जतसह लोणावळा, खालापूरमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. अकाळी झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. राज्यात एका बाजुला दुष्काळ आणि एका बाजुला पाऊस, अशी स्थिती निर्माण झाली आहे.