आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडगार वार्‍यांसह नाशिक शहरात रिमझिम पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात सोमवारी सकाळपासून रिमझिम पाऊस असल्याने वातावरणात गारवा जाणवत होता. तसेच, वार्‍याचा वेग हा नेहमीपेक्षा अधिक होता. शहरात 10.5 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्रात झाली आहे.

दक्षिण मध्य प्रदेश आणि विदर्भात काही भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मध्य प्रदेशच्या दक्षिण भागावर असेच क्षेत्र तयार झाले आहे. तसेच, समुद्रसपाटीवर कर्नाटक किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाल्याने पाऊस वाढला आहे.

शहरात रविवारी जोरदार पाऊस कोसळला होता, तर सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला. पावसाची रिमझिम दिवसभर सुरू राहिल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी होती. वातावरणात गारवा जाणवत होता. गंगापूररोड, कॉलेजरोड, नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प, दत्तमंदिर, बिटको पॉइंट, पंचवटी, इंदिरानगर, सिडको, सातपूर भागात पाऊस सुरू होता. शहरातील नासर्डी, वालदेवी आणि गोदावरी या नद्यांना पाण्याचा प्रवाह वाढला होता. सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्याने शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती.