आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain News In Marathi, Webbase Softwear, Maharashtra, Nashik, Divya Marathi

‘वेबबेस’द्वारे होणार महाराष्‍ट्रातील पर्जन्याची नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांत होणार्‍या पर्जन्यमानाच्या आकडेवारी संकलनासाठी नवीन वेबबेस सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. महसूल मंडळ स्तरावरून दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी संकलनासाठी व त्यावरून अहवाल तयार करण्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने वेबबेस सॉफ्टवेअर कृषी विभागाच्या मदतीने नव्याने तयार केले आहे.


सॉफ्टवेअरचा वापर करून महसूल मंडळ स्तरावरून दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी संकलनासाठी महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना या केंद्राकडून संगणकीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्र व राज्य स्तरावर कृषिविषयक नियोजन व धोरणात्मक निर्णय, तसेच संशोधनात्मक कामासाठी प्रत्येक महसूल मंडळस्तरावर पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.


सुरुवातीपासूनच नोंद
जून ते ऑक्टोबर 2013 या कालावधीत विभागातील पर्जन्यमानाची आकडेवारी संकलित करण्यात आली होती. माहिती अचूक व उपयोगी ठरली होती. त्यामुळे यंदा पहिल्या दिवसापासूनच या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पर्जन्यमान मोजले जाणार आहे.