आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसानेे त्र्यंबकेश्वरमधील कामांवर फिरवले ‘पाणी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर- कुंभपर्वानिमित्त प्रशासनातर्फे केल्या जात असलेल्या कामात दर्जा राखला जात नसल्याच्या अाराेपांत तथ्य असल्याचे रविवारी रात्री वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने अधाेरेखित केले. श्री शंभू पंचदशनाम जुना अाखाड्याजवळ उभारण्यात अालेल्या शेडचे पत्रे कागदाप्रमाणे हवेत उडून गेले. तर, साधूंचे निवाराशेड जलमय हाेऊन सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले.
त्र्यंबकमधील कुंभमेळ्यासाठी हाेत असलेल्या विकासकामांबाबत पहिल्यापासूनच अाेरड सुरू अाहे. उशिराने कामे हातात घेणे, त्यातही वरच्यावर कामे केली जात असल्याचे अाराेप प्रशासनावर हाेत अाहेत. प्रशासनाने दखल घेतली नसली तरी निसर्गाने या कामांची चांगलीच परीक्षा घेतली. रविवारी सुटलेल्या जाेरदार वाऱ्यात पत्र्यांचे शेड उद‌्ध्वस्त झाले. पत्रे हवेत उडाले. दैव बलवत्तर म्हणून अनेक बचावले. पर्वणी अथवा गर्दीच्या वेळी असा प्रकार घडल्यास माेठी अापत्ती अाेढवू शकतेे, अशी भीती अटल अाखाड्याचे महंत उदयगिरी महाराज यांनी व्यक्त केली.

धाेक्याचीघंटा
शासनकुंभमेळ्यावर काेट्यवधींचा खर्च करीत अाहे. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही कामे संथगतीने तर, काही दर्जाहीनच हाेत अाहेत. निसर्गाच्या एका फटक्यात शेड, खांबांची पडझड झाली. ही घटना धाेक्याची घंटा समजून प्रशासनाने जबाबदारी अाेळखावी, अशी साधू अपेक्षा व्यक्त करीत अाहेत.

कुठे पत्रे उडाले, तर कुठे उन्मळून पडले विजेचे खांब...
प्रसाधनगृहाची रचना चुकीची
साेमवारीहीसकाळीपासून वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसत हाेत्या. त्यामुळे अाखाड्यांमध्ये पाणी तुंबले. दरम्यानच्या काळात वाळूमुळे रखडलेली कामे अात्ताशी सुरू झाली हाेती. मात्र, या पावसाने ती कामेही अडचणीत अाली अाहेत. कैच्या नसल्याने पत्रे उडालेत. नया उदासीन अाखाड्यातील प्रसाधनगृहाची रचना पूर्णत: चुकली अाहे. त्यामुळे त्याच्या उपयाेगितेबाबत प्रश्नचिन्हच अाहे.

रविवारी रात्री झालेल्या पावसात त्र्यंबकेश्वर पालिकेच्या पार्किंगजवळ उन्मळून पडलेला विद्युत खांब.

जुन्या अाखाड्यातील ठप्प पडलेले काम, या अाखाड्याशेजारील अावाहन अाखाड्याला दिलेल्या शेडचे पत्रे उडाले अाहेत.

कामांची लागणार कसाेटी
शहरातीलरस्त्यांवर अद्यापही कच, खडी मातीचे ढिगारे पडून अाहेत. जूननंतर गायब झालेल्या पावसाने जाेर धरला अाहे. त्यात हाेणाऱ्या कामांची अागामी दाेन महिन्यात कसाेटीच लागणार अाहे. दहाही अाखाड्यांतील कामात त्रुटी अाहेत
अाधीच हाैस त्यात पाऊस | सलग दाेन दिवस संततधार; निवाराशेड जलमय