आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Satpute Speak About Motor Racing With Divya Marathi Team

केडगावच्या 'राज'ची मोटो रेसिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘धूम’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ताशी 250 किमी वेगाने गाडी चालवणे म्हणजे दिव्यच, त्यासाठी मोठय़ा धाडसाची आणि कौशल्याची गरज असते. केडगाव येथील राज रमेश सातपुते मात्र हे दिव्य अगदी सहज करत आहेत. छंद म्हणून मोटोरेसिंगचा सुरू केलेला हा प्रवास अवघ्या चार वर्षांत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेला आहे. 1000 सीसी स्पध्रेत भाग घेणारे महाराष्ट्रातील ते एकमेव स्पर्धक आहेत.

राज सातपुतेंना (25) लहानपणापासूनच भरधाव वेगाने मोटारसायकल चालवण्याचा छंद होता, हा छंदच त्यांना मोटोरेसिंगच्या क्षेत्राकडे घेऊन गेला. त्यांनी 2010 मध्ये कॅलिफोर्निया येथील सुपर बाईक्स क्लब येथे प्रशिक्षण घेऊन मोटोरेसिंगला सुरुवात केली. सुरुवातीला 165 सी. सी. क्षमतेच्या बाईकपासून सुरुवात करून आता ते 1 हजार सीसी क्षमतेची बाईक लीलया चालवतात. चेन्नई येथील मद्रास मोटोस्पोर्टस् आणि दिल्ली येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट या ट्रॅकवर झालेल्या नॅशनल चॅम्पियन स्पध्रेत 2011 मध्ये दुसर्‍या, तर 2012 मधील स्पध्रेतही त्यांनी विजेतेपद पटकावले. ते दरवर्षी भारतात 20, तर भारताबाहेर कॅलिफोर्निया, कतार, दुबई, मलेशिया आदी आठ देशांत होणार्‍या स्पर्धांत सहभागी होतात. सुझुकी जीएसएक्स् आर-1000 सीसी ही राज यांची आवडती मोटारसायकल आहे. 1000 सीसी क्षमतेच्या सुझुकी व यामाहा कंपनीच्या चार मोटारसायकली त्यांच्याकडे आहेत.

स्पर्धेत ताशी 250 ते 300 किमी वेगाने मोटारसायकल चालवावी लागते. वळणावरही ताशी 150 ते 170 किमीचा वेग राखावा लागतो. वळणावर जमीन आणि मोटारसायकल यांच्यातील कोन 60 अंशांपेक्षही कमी असतो. मोटारसायकल चालवताना ट्रॅक्शन कंट्रोल, माइंड कंट्रोल, नजर, चित्त आणि वेग, वेळ यांचा समन्वय ठेवावा लागतो. सेकंदाचे दुर्लक्षही अपघाताला कारण ठरू शकते. स्पर्धेत झालेल्या अपघातात कॉलर बोन तुटले होते. पण घातलेल्या विशिष्ट सूट, हेल्मेट, गार्डमुळे संरक्षण होते. राज हे मित्र रजनी क्रिशनन यांच्या साथीने चेन्नईला मोटोरे व इंडिया नावाचा क्लबही चालवतात. सध्या 40 विद्यार्थ्यांची टीम त्यांच्याकडे आहे. राज हे कर्नाटकमधील बंडीपूर फॉरेस्टमधील वाइल्ड लाइफ इंडियाचे सदस्यही आहेत.

उर्वरित बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...