आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांनी केली नाशिकमधील विविध कामांची पाहणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मंगळवारी गंगाघाट, कुसुमाग्रज उद्यान, गोदापार्क आणि पंपिंग स्टेशन येथे साकारणार्‍या नाशिक इतिहास संग्रहालयाच्या स्थळांना भेटी देऊन अधिकार्‍यांसह पाहणी केली. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करून सांडपाणी बंद करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले.
सर्वप्रथम त्यांनी गोदाघाट येथील रामकुंड परिसराची पाहणी केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी विविध सूचना त्यांनी केल्या. यानंतर त्यांनी कुसुमाग्रज उद्यानास भेट देत उद्यानाच्या दुरवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुराच्या पाण्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी तटबंदी करण्याची सूचनाही त्यांनी केली. यानंतर त्यांनी प्रस्तावित नाशिक इतिहास संग्रहालय, कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली. पेलिकन पार्क, पांडवलेणी येथील फाळके स्मारक व नेहरू उद्यानाला द्यावयाची भेट अचानक रद्द करून त्यांनी दुपारी मुंबईला प्रयाण केले. या दौर्‍यात महापौर अँड. यतिन वाघ, आयुक्त संजय खंदारे, सभागृहनेत्या सुजाता डेरे व पदाधिकारी उपस्थित होते.
राज यांच्या बोटाला जखम - कुसुमाग्रज उद्यानाची पाहणी करत असताना एका छोट्याशा लाकडी पुलाचा खिळा त्यांच्या बोटाला लागल्याने जखम झाली. यानंतर विर्शामगृहावर आल्यावर डॉ. प्रदीप पवार यांनी धनुर्वाताचे इंजेक्शन देऊन उपचार केले.