आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे आले.. आम्ही नाही पाहिले...वनाैषधी उद्यानाला गुप्त भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एरवी प्रसारमाध्यमांसमाेर नेहमी चमकणारे राज ठाकरे हे गुरुवारी अचानकपणे नाशकात दाखल झाले आणि काेणताही गाजावाजा करता महापाैर आणि काही निवडक अधिकार्‍यांसमवेत त्यांनी नेहरू वनाैषधी उद्यानाची पाहणीही केली. या भेटीचा सुगावा काेणालाही लागणार नाही, याची खबरदारी यावेळी घेण्यात आली. ‘राज ठाकरे आले.. पण आम्ही नाही पाहिले’, असाच सूर मनसेचे नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी पत्रकारांकडे आळवत हाेते.

गुरुवारी दुपारच्या सुमारास मनसेप्रमुख शहरात दाखल झाले. त्यानंतर हाॅटेल एक्स्प्रेस इन येथे त्यांनी महापाैरांसह काही अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच त्यांनी नेहरू वनाैषधी उद्यानाला भेट दिली. या उद्यानाचे महापालिकेच्या वतीने सुशाेभीकरण करण्यात येणार आहे. वनविभागाच्या अखत्यारीतील या नेहरू उद्यानातील २५ हेक्टर जागा महापालिकेकडे करार तत्त्वावर हस्तांतरित करण्यात येणार आहे. नािशकमध्ये येणार्‍या पर्टकांना आकर्षित करण्यासाठी टाटा फाउंडेशनच्या वतीने भव्य आणि सुसज्ज असे हे वनोद्यान नेहरू उद्यानात साकारले जाणार आहे. नाशिक महापालिकेचे अधिकारी, टाटा उद्योग समूहाचे काही अधिकारी आणि महापाैर अशाेक मुर्तडक यांनी राज ठाकरे यांच्यासमवेत या उद्यानाला भेट दिली. मात्र, या भेटीची माहिती गुप्त ठेवण्यात आली.

उद्यानात निरीक्षण मनाेरे अन‌् पॅगाेडा उभारणार
नेहरूउद्यानात सद्यस्थितीत असलेल्या वृक्षांना कोणताही धोका पोहाेचता, नवीन प्रजातींचे वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले जाणार आहे. सोबतच या ठिकाणी मंच, निरीक्षण मनोरे, बेंचेस, पॅगोडा, प्रसाधनगृह, चहा, कॉफी स्टॉल, जॉगिंग ट्रॅक करण्यासह सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच रोप-वे, पेरीफेरीयल वॉक वेचाही विचार करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...