आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांच्या दौर्‍यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या नाशिक भेटीत नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेमुळे चर्चेत राहिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी रात्री शहरात दाखल झाले. अचानक झालेल्या ठाकरे यांच्या आगमनामुळे मनसे पदाधिकार्‍यांची धावपळ उडाली.

ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 22) गोदापार्कचे भूमिपूजन होणार असल्याने ते शुक्रवारी नाशिकला येण्याची शक्यता होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारासच त्यांनी मुंबईहून नाशिककडे प्रयाण केले. रात्री 8.30च्या सुमारास त्यांचे शासकीय विर्शामगृहावर आगमन झाले. शुक्रवारी ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार असून, त्यानंतर गोदापार्क व अन्य विषयांवर पदाधिकार्‍यांशी चर्चाही करणार आहेत. लोकसभा निवडणुकीबाबत चाचपणीही या वेळी होण्याची शक्यता आहे.

टोलला ‘बाय बाय’
राज्य सरकार टोलविरोधात ठोस धोरण ठरवणार नाही तोपर्यंत टोल भरू नये, असे आवाहन करणार्‍या राज यांनी घोटी टोलनाक्याला ‘बाय बाय’ करीत नाशिककडे कूच केले. राज यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांबरोबरच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही गर्दी केली होती.