आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरपदासाठी राज ठाकरेंची भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थायीसमिती सभापतिपदासाठी विराेधात लढलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन महापाैरपदावर दावा केला. सभापतिपदाच्या निवडणुकीत शब्द फिरवल्याची अाठवण करून देत युती अबाधित ठेवण्यासाठी मनसेने एक पाऊल उचलावे, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, राज यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बाेलूनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
महापाैरपदासाठी येत्या काही दिवसांतच निवडणूक हाेत असून, यंदा भाजपने किंगमेकर हाेण्यापेक्षा किंग हाेण्यासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना मनसे या दाेघांचा पाठिंबा मिळवून महापाैरपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या अाहेत. भाजपचा दावा असताना मनसेने अपक्षांच्या मदतीने स्थायी समिती सभापतिपद मिळविले. त्यानंतर भाजपने मनसेसाेबतची युती तुटल्याचेही जाहीर केले. प्रत्यक्षात महापाैरपदाची निवडणूक ताेंडावर असल्यामुळे अाता मनसेसाेबत जुळवाजुळव सुरू झाली अाहे.
गुरुवारी उपमहापाैर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गटनेते संभाजी माेरुस्कर, विजय साने, बाळासाहेब सानप अादींसह पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. दहा वर्षांपासून भाजप सत्तेत असूनही महापाैरपद मिळालेले नाही. त्यामुळे यंदा मनसेने भाजपला साथ द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात अाला आहे.
पक्षच घेणार निर्णय
भाजपनेमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन महापाैरपदासाठी दावा केला अाहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेश स्तरावरील पदाधिकारी अंतिम निर्णय घेणार असून, हे नेते राज ठाकरे यांच्याशी चर्चनंतर निर्णय घेतील. लक्ष्मणसावजी, भाजप