आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, MNS, Lok Sabha Election, Divya Marathi

ते आले, ते बोलले. पण हंशा, टाळ्याविनाच परतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - ते आले, ते बोलले आणि त्यांनी जिंकले असे ज्यांचे वर्णन करायचे त्या राज ठाकरे यांचे सिन्नरच्या जाहीर सभेतील भाषणाचे सूर लागलेच नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीतील राज यांचे सिन्नर येथील भाषण यापूर्वीच्या वर्ल्डकपमध्ये 6 चेंडूवर 6 षट्कार ठोकणार्‍या युवराजसिंगच्या फलंदाजीसारखे. तर, आताचे भाषण युवराजसिंगने नुकत्याच केलेल्या रटाळ फलंदाजीसारखे होते.
टीकास्राचा भाता रिता
राजकीय वस्त्रहरण करणारी बोचरी टीका, आग ओकणारे शाब्दिक तोफगोळे, वाक्या-वाक्याला हंशा आणि टाळ्या वसूल करणारे आणि र्शोत्यांच्या मनाला जाऊन भिडणारे विनोद, वागण्या-बोलण्याची नक्कल करत पवार-भुजबळ-उध्दव ठाकरेंवर प्रहार करताना र्शोत्यांची हसून मुरकुंडी वळवण्याचे कसब असलेला ‘दशसहस्त्रेषू वक्ता’ अशी राज यांची ख्याती या सभेत कुठे लुप्त झाली, याचा शोध घेण्याची वेळ र्शोत्यांवर आली. वेगवेगळी शब्दास्त्रे डागून सभा डोक्यावर घेणार्‍या ठाकरे यांच्याकडील टीकास्राचा भाता रिकामा झाल्याने अपेक्षाभंग झाल्याची चर्चा करतच र्शोते घराकडे परतले.
सॉफ्ट टार्गेट अनटचेबल
भुजबळ यांच्यावर टीका करण्यासारखे अनेक मुद्दे असताना त्यांच्या भाषणात भुजबळांचा उल्लेख चार-दोन वाक्यातच संपला. पवार काका-पुतण्यासह कॉँग्रेस आघाडीचे नेते कठोर टीकेपासून त्यांनी अस्पर्शी ठेवले. तर, शिवसेना व उध्दव ठाकरे यांच्यावर अवाक्षरही काढले नाही. पाठिंबा मोदींना नव्हे तर मोदींच्या कामाला एवढय़ाच शब्दात ‘नमो’चा उल्लेख संपवतांना त्यांनी राजनाथसिंह यांच्या खुलाशावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
गितेंना उत्तमरावांनी जोडले हात
एरवी भाषणासाठी सज्ज असलेले उत्तमराव ढिकले यांनी पुढे येण्यास टाळाटाळ करत गिते यांनाच आग्रह केल्याने गिते भाषणास उठले. ओबीसींच्या मुद्याला हात घालताना त्यांनी ढिकले यांच्याकडे रोखून पाहिले तेव्हा उत्तमरावांनी आपल्या स्टाइलमध्ये दोन्ही हात उंचावून जोडत त्यांना केलेला नमस्कार र्शोते व पत्रकारांच्या नजरेतून सुटला नाही. आपले आजोबा व काकांनी नगराध्यक्ष या नात्याने सिन्नरकरांना बरेच काही दिले; पण चांडक परिवाराने आपल्याकडे आजवर काही मागितले नाही असे म्हणत अतुल चांडक यांनी या वेळी मनसेला मते द्या, असे आवाहन करून सभेत भाव-भावना ओतण्याचा प्रयत्न केला, एवढेच.