आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, MNS, Rajnath Singh, BJP, Narendra Modi, Divya Marathi

पाठिंबा मोदींना नाही, त्यांच्या कामांना!, भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांना राज ठाकरे यांचे उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पुण्याच्या सभेत पाठिंबा कोणी मागितला नाही, पाठिंबाच द्यायचा असेल तर भाजपात विलीन व्हा, असा सल्लावजा टोला राज ठाकरे यांना लगावला होता. यावर राज काय बोलणार याकडे लक्ष लागलेले होते. येथे झालेल्या सभेत त्यांनी पाठिंबा मोदींना नाही, तर त्यांच्या कामांना असल्याचे स्पष्ट करत, अशी कामे महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांनी केलेली नसल्याने त्यांच्यावरही टीका केली.
येथील वंजारी समाजाच्या पटांगणावर मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारार्थ सभेत राज यांनी पुन्हा एकदा मोदींवर कौतुकसुमने उधळली. तर, आघाडीवर टीकास्र सोडले. याच वेळी त्यांनी आपला पाठिंबा विकासालाच असल्याचे स्पष्ट केले. सभेस सरचिटणीस आमदार वसंत गिते, अतुल चांडक, मंगेश सांगळे, उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, महापौर अँड. यतिन वाघ, प्रकाश दायमा, सचिन ठाकरे, शेकापचे अँड. मनीष बस्ते, जयंत आव्हाड, कृष्णा कासार आदी नेते उपस्थित होते.
मी कसा संकुचित ठरतो?
मी संकुचित वृत्तीचा असल्याची टीका केली जाते. प्रांतवादाचा शिक्का माझ्यावर मारला जातो, पण मी राज्याचा विचार करतो. शरद पवारांनी अनेक पदे उपभोगली, पण केवळ विकास बारामतीचा केला. विलासराव देशमुखांना महाराष्ट्र आपला न वाटता केवळ लातुर आपले वाटले. राज्यात केवळ यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब ठाकरे या दोनच महापुरुषांनी संपूर्ण राज्याचा विचार केला. त्यामुळे मी राज्याचा विचार केल्यास संकुचित कसा ठरतो?
भुजबळ आणि इंडिया बुल्स लक्ष्य
* इंडिया बुल्सने शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या. जमिनीखालून जलवाहिनी नेली; मात्र पिण्यासाठी पाणी देण्याचे त्यांना सुचले नाही.
* भुजबळांनी इंडिया बुल्सला रेल्वेलाइन टाकण्यास मदत केली; पण नाशिक - पुणे रस्त्याचे काय?
* हिमाचल प्रदेशात उद्योगास परवानगी देताना तेथील सरकारने 80 टक्के नोकर्‍या भूमिपुत्रांना देण्याची अट घातली. आपले शासनकर्ते उद्योजकांकडून टाकलेल्या तुकड्यांवर समाधान मानतात.
* इंडिया बुल्सच्या भुजबळांकडून पैसे वाटले जातील ते घ्या. त्यांना लुटण्याची संधी सोडू नका.