आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Rah Stay In Nashik

राज पुन्हा चारदिवस नाशिक मुक्कामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाता माझा नाशिक मुक्काम वाढेल, असे सांगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंधरादिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा नाशिक दाैऱ्यावर येत अाहेत. १२ ते १६ डिसेंबर अशा चारदिवसांच्या दाैऱ्यात ते व्यापारी, उद्याेजक, सामाजिक संस्थांच्या प्रमुखांच्या भेटीगाठी घेणार असून, पक्षाच्या पुनर्बांधणीबराेबरच महापालिकेकडून त्यांच्या काय अपेक्षा अाहेत त्याचे निराकरण कसे केले पाहिजे, याचा अाढावा घेणार अाहेत.
विधानसभानिवडणुकीतील पराभवानंतर राज यांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केले अाहे. महापालिकेत मनसेची सत्ता असून, लाेकांशी पुन्हा नाळ घट्ट करण्यासाठी २७ नाेव्हेंबर राेजी नाशिक दाैऱ्यावर अालेल्या राज यांनी संघटनात्मक पुनर्बांधणीवर भरदिला हाेता. त्यावेळी माध्यमांशी बाेलताना येत्या वर्षभरात संपूर्ण फाेकस नाशिकवरच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले हाेते. त्याचा प्रत्यय देतानाच ते १२ डिसेंबरपासून पुन्हा नाशिकला चार दिवस दाैरा करतील. या दाैऱ्यात प्रामुख्याने व्यापारी, उद्याेजक, िनमा-अायमासारख्या प्रमुख संघटना, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. गाेदापार्क, शिवाजी उद्यान अशा महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करतील, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. राज यांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापाैरांसह पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू झाली असून, अाठवडाभरात राज यांनी िदलेल्या सूचनांची अंमलबजावणी कशी झाली, याचा अाढावा घेतला जात अाहे.
डाॅ. पवार, भाेसले यांच्या बढतीची शक्यता

राजयांच्या दाैऱ्यात पक्षांतर्गत माेठे फेरबदल जाहीर हाेण्याचीही शक्यता अाहे. वसंत िगते, सचिन ठाकरे, प्रकाश दायमा यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशजिल्‍हास्तरावरील माेठी पदे रिक्त झाली अाहेत. या पदावर माजी अामदार नितीन भाेसले,जिल्‍हा कार्यकारिणीतील डाॅ. प्रदीप पवार यांना माेठी जबाबदारीदिली जाण्याची शक्यता अाहे.