आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांचे साधेपणाने स्वागत, अाजपासून शहरात दाैरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसेच्याभवितव्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या नाशिकच्या नवनिर्माणाचा अाढावा घेण्यासाठी मुरगळलेला दुखरा पाय घेऊन राज ठाकरे शुक्रवारी (दि. १२) दुपारी शहरात अाले.
दरम्यान, दुपारी थोड्या विश्रांतीनंतर काही उद्याने, तारांगण प्रकल्पाला भेट देणार होते. मात्र, डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्लादिल्यामुळे नियाेजित कार्यक्रम पुढे ढकलत त्यांनी अाराम करणे पसंत केले. शनिवारी (दि. १३) सकाळपासून त्यांचे नियाेजित दाैरे मात्र हाेणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी कळवले.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बंडानंतर राज यांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केले अाहे. पंधरावड्यापूर्वी त्यांनी येथील संघटनात्मक फेरबदलासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या हाेत्या. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना अाता नियमित येणे असेल, असेही सांगितले हाेते. म्हणून की काय पंधरवड्यात दुसऱ्यांदा राज अाले. प्रवासादरम्यान पाय मुरगळल्यामुळे नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर डाॅक्टरांनी अाराम करण्याचा सल्लादिल्यानंतर त्यांचे नियाेजित दाैरे रद्द झाले. मात्र, काही वेळाने बरे वाटल्यानंतर त्यांनी पुन्हा दाैऱ्याला जाण्याची तयारी केली. मात्र, मुरगळलेल्या पायाने फारसे चालता येणार नाही हे लक्षात अाल्यावर पुन्हा दाैरा रद्द करीत त्यांनी विश्रांती घेतली.

शक्तिप्रदर्शनाला दिला फाटा
राजयांचे साधेपणाने स्वागत करण्यात अाले. राज यांचे नाशिक दाैरे वाढणार असल्याने प्रत्येक वेळी शक्तिप्रदर्शन टाळण्याचा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सल्लादिल्याचे समजते. मात्र, राज यांच्या स्वागतासाठी प्रमुख पदाधिकारी नगरसेवक झाडून हजर हाेते. यानंतर महापाैरांनी नगरसेवकांची बैठक घेऊन दाैऱ्याच्या तयारीचा अाढावा घेतला.