आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज दौरा दिवसभराचाच, सिंहस्थ कुंभमेळा कामांची पाहणी पुढे ढकलली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकामे आणि वाहतूक बेटांच्या पाहणीसाठी राज ठाकरे दाेन दिवसांची सवड काढून आले खरे, पण पालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे ते एका दिवसातच परतले. दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकात काेणतेही राजकीय फेरबदल त्यांनी केले नाहीत. १३ १४ फेब्रुवारीला ते पुन्हा शहरभेटीला येण्याची शक्यता आहे.

अवघ्या काही महिन्यांवर सिंहस्थ येऊन ठेपल्याने विकासकामांनी गती धरली आहे. यात साडेचारशे काेटींची रस्त्याची कामे आहेत. याशिवाय साधुग्रामसह अन्य कामेही जाेरात सुरू आहेत. मात्र, या कामांच्या दर्जाबाबत आता शंका उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कामांची पाहणी करण्याचे नियाेजन राज ठाकरे यांनी नाशिक दाैऱ्यात केले होते. त्याचप्रमाणे वाहतुकीची काेंडी साेडविण्यासाठी तसेच रस्ता सुशाेभीकरणासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतूक बेटात बदल करण्याचेही नियाेजन करण्यात आले होते.

महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत राज ठाकरे यांचा हा दाैरा होणार होता. परंतु जळगाव महापालिकेच्या घरकुल घाेटाळ्याच्या खटल्यात आयुक्तांची महत्त्वाची साक्ष असल्याने ते जळगावकडे रवाना झाले होते. त्यामुळे राज यांनी जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावून त्यानंतर आपला नाशिकचा दाैराही रविवारीच आटाेपता घेतला.

वातावरण बदलाने उन्हाळ्याला आव्हान दिले. पण झाडे मात्र फसली नाहीत. उन्हाळ्याची चाहुल लागल्यानंतर लगेचच अंगावरची हिरवी पाने फेडून पिवळ्या फुलांचा साज या पिवळ्या फुलांच्या झाडाने (ट्युबेराेसा अर्जेंटिना) चढविला. हे झाड विश्रामगृहाच्या प्रांगणात लक्षवेधी ठरत आहे. नाशिक दाैऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनाही या झाडाने माेहिनी घातली. उद्यानविद्यातज्ज्ञ मिलिंद मेहता यांना बोलावून त्यांनी या झाडांची राेपे मुंबईत मागवून घेतली. कदाचित काही काळानंतर नाशिकचा एखादा रस्ता अशा पिवळ्या फुलांनी बहरलेला दिसेल.