आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांचा दाैरा आटाेपला, कार्यकारिणी मात्र ‘जैसे थे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लाेकसभा आणि विधानसभानिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीत माेठे फेरबदल हाेतील, असे संकेत देण्यात येत हाेते. राज ठाकरे यांच्या यंदाच्या नाशिक दाैऱ्यात हे फेरबदल जाहीर केले जातील, असेही सांगितले जात हाेते. परंतु, गारपिटीचे कारण पुढे करीत फेरबदल करताच राज मुंबईला रविवारी परतले आहेत.
पक्षात आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, असा दावा करीत तत्कालीन आमदार वसंत गिते यांनी राज ठाकरेंवर काही महिन्यांपूर्वी नाराजी दर्शविली हाेती. परंतु, त्यांची समजूत काढीत राज यांनी त्यांना पक्षात पुन्हा कार्यरत केले. मनसेचे शहरात ३९ नगरसेवक असतानाही वसंत गिते यांना विधानसभेत पराभव पत्कारावा लागला. पक्षातील अनेकांनी गिते यांच्या विराेधात काम केल्याचे बाेलले गेले. त्यानंतर गिते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामेदिले. या पार्श्वभूमीवर पक्षात माेठे फेरबदल करण्याचे संकेत स्वत: राज ठाकरे यांनीच दिले हाेते.
गारपीटग्रस्त भागाला भेट
राजठाकरे यांनी रविवारीजिल्‍हृयातील गारपीटग्रस्त भागांना भेटदिली. या ठिकाणी शेतकऱ्यांचे म्हणणे त्यांनी एेकून घेतले आणि त्यानंतर ते लगेचच मुंबईला रवाना झाले. तत्पूर्वी ते पक्षाची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करतील, असा अंदाज लावला जात हाेता. मात्र, पक्ष कार्यकर्त्यांचे सर्व अंदाज फाेल ठरवत राज यांनी पदांसाठी इच्छुक असलेल्यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग केला आहे.