आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राज\'गर्जना- ब्रिटिशांना काळजी, पण सरकार बेजबाबदार, म्‍हणाले- CM अजूनही विरोधी पक्षात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्‍यातील सरकारला लोकांच्‍या जिवांची किंमत नाही. त्यामुळेच तर, सावित्री नदीवरील महाडचा पूल कोसळला. ब्रिटीशांना काळजी पण सरकारला नाही, असे म्‍हणत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली आहे. नाशिकच्‍या गोदावरीला आलेल्‍या पुराची पाहणी करत राज यांनी पुरग्रस्‍तांची भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाडच्‍या दुर्घनेवर सरकारची प्रतिक्रीया हीदेखील संवेदनाहीन आहे. काहीतरी ठोस उपाययोजना झाल्‍या पाहिजे. दुर्घटना घडली नेते, लोकप्रतिनिधी बोलतात व काही दिवसांनी विसरतात मात्र असे किती दिवस चालणार? असा प्रश्‍नही ठाकरे यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. नाशिकला आलेल्‍या महापूराची त्‍यांनी पाहाणी केली. नुकसानग्रस्‍त परिसराचा आढावा घेऊन, पुरग्रस्‍तांच्‍या भेटी घेतल्‍या. "ज्यांनी पूल बांधले ते त्यांच्या देशात निघून गेले. पूलाचे आयुष्य संपल्याचे पत्रही ते तेथून पाठवतात. अन्‌ आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. लोकांच्या जीवाचे काही मोल आहे की नाही? त्याचे मोल सरकारला वाटते की नाही? लोकांनीही बदलले पाहिजे. सत्ताधा-यांना उत्‍तर मागितले पाहिजे. असेही राज यावेळी म्‍हणाले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, आणखी काय म्‍हणाले राज ठाकरे.. सरकारवर या शब्‍दात केली टीका..
बातम्या आणखी आहेत...