आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिककरांना विस्थापित करणारी नियमावली रद्द करणार काय?, राज ठाकरें

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातनऊ मीटरखालील निम्म्या मिळकती असून येथील रहिवाशांना विस्थापित करणारी व्हायरल झालेली विकास नियंत्रण नियमावली मुख्यमंत्री उद्या (दि. १८) रद्द करण्याचे वचन देणार का, की थापा मारून मोकळे होणार, असे थेट अाव्हानच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. भाजपवर चाैफेर हल्ला करताना मुख्यमंत्र्यांची नक्कल करत ‘मी भाजपकुमार थापाडे’ अशी टिंगल तर केलीच, मात्र या भ्रष्टाचाराच्या चिखलात रूतलेल्या, गुंडांच्या बळावर लढणाऱ्या नतद्रष्टांना सत्ता देऊन शहराची पुन्हा वाट लावणार का? असा सवालही केला. 
 
गाेल्फ क्लब येथील सभेत राज यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की, भाजपकडून थापा मारण्यापलीकडे काहीच झालेले नाही. स्वीस बँकेतून १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याची नरेंद्र माेदी यांनी घाेषणा केली, मात्र एक रुपयाही काेणाच्या खात्यात अाला नाही येणारही नाही. मध्यंतरी स्वीस बँकेच्या एका मराठी अधिकाऱ्याने स्वीस बँक पैसे तर साेडा, मात्र साधी नावेही देणार नाही असे मला सांगितले. अमेरिका यादी मागून मागून थकली तर भारताची काय गत, असे सांगितल्याकडे राज यांनी लक्ष वेधले. त्यानंतर नाशिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मुद्याला हात घालत त्यांनी व्हायरल विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरातील नाशिककर कसे विस्थापित हाेतील याकडे लक्ष वेधले. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये नऊ मीटरखालील रस्त्यासन्मुख बांधकामांवर निर्बंध अाले अाहेत. त्यामुळे मूळ नाशिककरांना कुटुंब विस्ताराच्या अनुषंगाने घरे वाढवता येणार नाही. ज्यांची अार्थिक स्थिती नाही त्यांना जागा विकून शहराबाहेर स्वस्तात माेठ्या जागा घ्याव्या लागतील. त्यामुळे ही जर नियमावली खरी असेल, तर नाशिककरांची वाट लागणार अाहे. त्यामुळे उद्या याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा असून त्यांनी ही नियमावली रद्द करेन असे एकतर वचन द्यावे किंवा थापा मारून माेकळे व्हावे. यापैकी एक काहीतरी करावे, असा चिमटा घेतला. 
 
मुख्यमंत्र्यांची नक्कल: गेल्यानिवडणुकीत राज यांनी भुजबळ यांची नक्कल करून मनसेची हवा निर्माण केली. यंदा सुरुवातीला मी हे करेन, ते करेन अशी मुख्यमंत्र्यांच्या अावाजातील नक्कल करून त्यांनी कार्यकर्त्यांची करमणूक केली. 
 
नाशिकमध्ये हे केले 
कर्टनसारखा कारंजा भारतात कोठेही नाही 
- नाशिकमधील दादासाहेब फाळके स्मारकाची बाॅलीवूडला भुरळ पडेल असा विकास करणार 
- पुढच्या पाच वर्षांत दुपटीने-तिपटीने कामे वाढतील 
-  नाशिकच्या खत प्रकल्पातील खत शेतकऱ्यांना दिले जाते. 
- नाशिक शहरातील २०० घंटागाड्यांद्वारे जीपीएस ट्रेकिंग होते 
-  कुंभमेळा यशस्वी झाल्याने अमेरिकेने केला महापौरांचा सत्कार, मुख्यमंत्र्यांचा नव्हे 
- निवडणुकीसाठी लोकांना ओरबाडून पैसे लागत नाही 
-  १९५२ मध्ये जन्म झालेल्या जनसंघाला उमेदवार मिळत नाही 
-  शहर विकास हे माझे पॅशन आहे, म्हणून मी काम करतो 
- काही नतद्रष्ट माणसं शहराला ओरबाडायला निघाले अाहेत 
 
मनसेतून गेले ते मेले 
मनसेतून गेलेल्यांवर तुटून पडत राज यांनी जे गेले ते एकटे गेले, संघटन समाेर दिसत अाहे असे बुस्ट देण्याचा प्रयत्न केला. जे गेले ते आपल्यासाठी मेले असे सांगतानाच भाजपने पैशाची गोणी ओतली अाणि हे वास काढत तिकडे गेले, अशी जाेरदार टीकाही केली. सभेची गर्दी बघून अापला विजय निश्चित अाहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
गुंडांच्या हाती सत्ता देणार का? 
शिवसेनाभाजपत गुन्हेगार उमेदवारांचा भरणा लक्षात घेत पाेलिसांनी स्वत: प्रसारमाध्यमांना यादी दिल्याचा गाैप्यस्फाेट राज यांनी केला. हे गुन्हेगार नगरसेवक झाल्यास गुन्हे वाढतील, दराेडे पडतील, लूटमार हाेईल अशी भीती त्यामागे हाेती, असेही राज यांनी सांगितले. तब्बल ८८ गुन्हेगारांचा भरणा असल्याकडे लक्ष वेधत त्यात शिवसेना भाजपची संख्या अधिक असल्याचे सांगितले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, नाशिकमध्ये हे केले... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...