आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Rally Issue At Mumbai, Divya Marathi

राज यांच्या सभेसाठी जाणार नाशकातून 35 हजार मनसैनिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शनिवारी (दि. 31) मुंबईत होणार्‍या जाहीर सभेसाठी नाशिकमधून सुमारे 35 हजार मनसैनिक रवाना होणार आहेत. यासंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाले असून, शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहे.

‘या, मला आपल्याशी बोलायचंय!’ अशी भावनिक साद राज यांनी प्रथमच कार्यकर्त्यांना घातली आहे. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते मनसैनिकांशी काय संवाद साधणार याकडे लक्ष लागून आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता सोमय्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. सभेची तयारी करण्याच्या दृष्टीने नाशिक शहर मनसेतर्फे शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील विभागनिहाय, तसेच नाशिक जिल्हा मनसेतर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सभेला जाण्यासाठी नियोजनाच्या बैठका घेण्यात आल्या. या वेळी पक्षाचे नाशिक संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले. प्रदेश सरचिटणीस तथा आमदार वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, आमदार अँड. उत्तमराव ढिकले, महापौर अँड. यतिन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, प्रकाश दायमा, संदीप पाटील, शहराध्यक्ष अँड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते. शहरासह जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार वाहनांमधून 35 हजार कार्यकर्ते जाणार आहेत. त्यासाठी विभागीय अध्यक्ष संजय दंडगव्हाण, मुजाहिद शेख, मोहन मोरे, गोकुळ नागरे, संतोष सहाणे, अनंत सूर्यवंशी, अँड. अभिजित बगदे, पराग शिंत्रे, निमा जगताप, सुजाता डेरे, मंगला रुडकर, वैशाली पोतदार आदी प्रयत्नशील आहेत.
सभेला जाण्याचे नियोजन पूर्ण
जाहीर सभेला जाण्यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे. सकाळी 10 वाजेपासून वाहने मुंबईला रवाना होतील. तयारीविषयी झालेल्या बैठकांमध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सूचना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. राहुल ढिकले, शहराध्यक्ष, मनसे