आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजसाहेबांच्या प्रतीक्षेत ताटकळले विद्यार्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज ठाकरे यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही सोमवारी बसला. सातपूर येथील स्वर्गीय मॉँसाहेब मीनाताई ठाकरे शाळा इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी सकाळी तब्बल 8 वाजेपासून विद्यार्थ्यांच्या हातात लेझीम देऊन त्यांना उभे करण्यात आले. मात्र, नेहमीप्रमाणेच राज यांचे आगमन उशिरा झाल्याने या विद्यार्थ्यांना तब्बल अडीच तास ताटकळत बसावे लागले.
या प्रकाराने कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व पालकांना मोठा त्रास झाला. हा कार्यक्रम सभागृहनेते शशिकांत जाधव व सातपूर प्रभाग सभापती सुरेखा नागरे यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमास आमदार उत्तमराव ढिकले, आमदार नितीन भोसले, सुजाता डेरे, शर्वरी लथ, नगरसेवक सलीम शेख, उषा शेळके, सुवर्णा मटाले, शीतल भामरे, अरविंद शेळके, अशोक मुर्तडक, सुरेखा भोसले आदी उपस्थित होते. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी किरण कुवर, मुख्याध्यापक सतीश भांबर व प्रकाश शेवाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राज यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आलेल्या 12 विद्यार्थ्यांचा, तर दहावीत शहरात प्रथम आलेल्या कोमल उशीर, वैशाली काळे, प्रणिता पाटील व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचा राज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘आम्ही आहोत बरं का.’
राज यांच्या दौर्‍याकडे रविवारी आमदार वसंत गिते यांच्यासह काही नगरसेवकांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे सातपूरच्या या दौर्‍यात सहभागी नगरसेवकांनी खास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन ‘आम्ही आहोत बरं कां’ अशी आठवण करून दिली. नगरसेविका सविता काळे व रेखा बेंडकोळी यांनी मात्र या दौर्‍याकडे पाठ फिरविल्याचे जाणवले.