आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त एकत्र राहा... महापौर मनसेचाच, राज ठाकरे यांचा ठाम विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तुम्ही एकीने राहा.. दहा दिवस आराम करा.. जे काही करायचे ते आम्ही करत आहोत. एक मात्र लक्षात ठेवा, महापौर मनसेचाच होईल, असा ठाम विश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी 'कृष्णकुंज'वर मनसे नगरसेवकांसमोर व्यक्त केला.
शिवसेनेने मनसेसह काँग्रेसचे नगरसेवक फोडल्याचे वृत्त मंगळवारी आल्यानंतर दोन िदवसांत महापौर निवडणुकीसंदर्भात जोरदार घडामोडी घडल्या. बुधवारी रात्रीच मनसे नगरसेवकांना मुंबईला धाडण्यात आले. रात्री त्यांचा मुक्काम कल्याण फाट्याजवळील एका रिसॉर्टवर होता. पुरुष व महिलांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था होती. दुपारी राज यांची भेट घेण्यासाठी नगरसेवकांची टीम ह्यकृष्णकुंजह्णवर गेली. राज यांनी त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला. ह्यपक्षाचे पदाधिकारी मुंबई व नाशिकमधील नेत्यांच्या माध्यमातून जुळवाजुळव करीत आहेत. महापौर मनसेचाच होईल, असे सांगत त्यांनी नगरसेवकांना निर्धास्त राहण्याचा सल्ला दिला.
दहा नगरसेवक नाराज : मनसेचे दोन नगरसेवक अद्यापही ह्यसंपर्काबाहेरह्ण आहेत. राज यांनी स्वत: त्यांच्याशी संपर्क साधल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे हे नगरसेवक लवकरच मूळ गोटात दाखल होतील, असाही दावा केला जात आहे. वास्तवात, मनसेचे जवळपास दहा नगरसेवक नाराज असून, त्यातील काहींनी मुंबईत राज यांची भेट घेऊन पुन्हा नाशिककडे परतणे पसंत केले.
जबाबदारीची विभागणी : मुंबईतून राज ठाकरे व मनसेचे आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात राहणार आहेत. नाशिकमध्ये आमदार वसंत गिते, प्रदेश चिटणीस अतुल चांडक, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्याकडे सूत्रे आहेत. स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले नगरसेवकांबरोबरच सहलीवर असून, तेथील नियोजन त्यांच्याकडे राहील, असे सांगण्यात आले.
मुक्काम गुजरातमध्ये

राज यांच्या भेटीनंतर मनसेचे नगरसेवक अहमदाबादकडे रवाना झाले. मजल-दरमजल करत ते जयपूरकडे जाणार आहेत. जयपूरचे ह्यलोकेशनह्ण उघड झाल्याने काळजी म्हणून मुक्काम हलवण्यात आल्याचे नगरसेवकांनी सांिगतले. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता अहमदाबाद िवमानतळावर उतरलेल्या नगरसेवकांनी पुढे बसमधून प्रवास केला.
भाजपला सभापतिपद
वाटाघाटीनुसार महापौरपद मनसेला, तर भाजपला स्थायीचे सभापती व सभागृहनेतेपद िदले जाण्याची शक्यता आहे. सहा अपक्षांची भूमिका िनर्णायक असल्याने त्यांनी उपमहापौरपदावर दावा केल्याचे समजते. यापूर्वी मनसेने स्थायीच्या िनवडणुकीत अपक्षांना गळाला लावले होते. तसे झाले तर मनसे-भाजप-अपक्ष यांचे संख्याबळ ६२ पर्यंत पोहोचून सत्तेचे गणित जुळेल, असे चित्र आहे.
पैशांचे आमिषही फुसके
मनसेने नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवताच गणित फिस्कटण्याची चिन्हे दिसू लागल्याने तसेच ह्यलक्ष्मीदर्शनाह्णचे दाखवलेले आमिषही फुसके असल्याचे लक्षात आल्याने अनेक नगरसेवक मूळ पक्षाकडे परतू लागल्याचे वृत्त आहे.