आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या थंड कारभाराबाबत राज ठाकरे विचारणार प्रश्न, 10 नाेव्हेंबरला नाशकात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तब्बल सात महिन्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे १० नाेव्हेंबरला नाशिक दाैऱ्यावर येत असून या दाैऱ्यात केंद्रासह राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या महापालिकेतील थंड कारभाराकडे नाशिककरांचे लक्ष वेधणार अाहेत. मनसेची सत्ता असताना, दर महिन्याला काय केले असा सवाल करणाऱ्यांना राज अाता भाजपविषयी काेणीच का बाेलत नाही, असा सवाल करणार असल्याचे नेत्यांचे म्हणणे अाहे.
 
नवनिर्माणाचे स्वप्न दाखवून मनसेने महापालिकेची सत्ता मिळवली; मात्र सत्ता मिळाल्यानंतर राज यांचे नाशिककडे दुर्लक्ष झाल्याचा अाराेप हाेता. त्यातून मनसेची सत्ता स्थापन झाल्यानंतर लगाेलग थंड कारभाराबाबत टीका हाेऊ लागली. सत्ता मिळाल्यानंतर काही महिने उलटल्यानंतरही ठाेस कामे हाेत नसल्याचे अाराेप झाले. त्यातूनच राज यांनी ‘पाळणा हलण्यासाठीही नऊ महिने थांबावे लागते’, असे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यातून पुढे त्यांच्याविषयी निराशा वाढत गेली. पुढे मनसेची वाताहत झाल्यामुळे तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लाेटल्यानंतरही ठाेस कामे झाली नाही. अखेरच्या टप्प्यात राज यांनी सीएसअार अॅक्टिव्हिटीतून कामे केली; मात्र त्याचा उपयाेग निवडणुकीत झाला नाही.
 
दरम्यान, अाता भाजपची केंद्र राज्यात सत्ता असूनही तसेच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाशिक दत्तक घेतले असतानाही सात महिन्यांत ठाेस काम झालेले नाही. अातापर्यंत निव्वळ घाेषणांचा पाऊस पडला असून प्रत्यक्षात नाशिककरांच्या पदरात काहीही पडलेले नाही. याउलट लाेकांवर करवाढ लादण्याचेच प्रयत्न झाल्याचे लपून राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर, नाशिकला १० ते १२ नाेव्हेंबर या काळात येणारे ठाकरे शहराच्या विकासाचा अाढावा घेतील.
 
मनसेने केलेली विकासकामे, त्यांच्याकडे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष, वाहतूक बेटांची माेडताेड अादी मुद्यांबाबत अाढावा घेत ठाकरे नाशिककरांना ‘अाता काेणी भाजपच्या कामगिरीबाबत काही प्रश्न उपस्थित का करीत नाही’, असा सवाल उपस्थित करणार अाहेत. या मुद्यावरूनच ठाकरे नाशिकमध्ये अाक्रमक हाेणार असून अडचणीत असलेल्या मनसेलाही शहरात काम करण्यासाठी या निमित्ताने दिशा दिली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...