आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या पुनर्बांधणीसाठी नगरसेवकांची तटबंदी भक्कम करण्याचे राज ठाकरेंचे प्रयत्‍न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसेच्या पुनर्बांधणीसाठी नगरसेवकांची तटबंदी भक्कम करण्याचे राज ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले असून, त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या नगरसेवकांना नाशिकमध्ये पक्षामार्फत कसे नवनिर्माण चालले अाहे, याचा अभ्यास दाैराच त्यांनी घडवून अाणला. एखादे शहर कसे वसविता येते, याच्या टिप्सही देत त्यांनी मुंबईत नाशिकमधील काही प्रयाेग साेप्या पद्धतीने कसे राबवता येतील, याबाबत मार्गदर्शनही केेले.
शुक्रवारी नाशिक दाैऱ्यावर अालेल्या राज ठाकरे यांचा पाय मुरगळल्यामुळे त्यांनी सायंकाळी विश्राम घेणे पसंत केले. शनविारी मात्र त्यांनी सकाळपासूनच दाैऱ्याला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी तिडके काॅलनीजवळील ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क शविाजी उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर उद्याेजकांबराेबर बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी िसंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गाेदाघाटाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर गाेदापार्कच्या दाेन्ही टप्प्यांची पाहणी करून त्यांनी चांदसी शविारात मनाेज टिबरीवाल यांनी विकसित केलेल्या उद्यानाची पाहणी केली. यावेळी मनसेचे मुंबई महापालिकेतील नगरसेवकही उपस्थित हाेते. गटनेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २८ नगरसेवक सहभागी झाले हाेते. या सर्वांनी कमी खर्चात छाेट्या जागेत चांगले उद्यान कसे वसविता येते, याच्या टिप्स घेतल्या. त्यानंतर राज यांच्या संकल्पनेतील बगिच्यांचे शहर बघण्यासाठी नगरसेवकांनी पाहणी दाैरे केले. सायंकाळच्या टप्प्यात पुष्प उद्यान तसेच सटिी गार्डन, अायुर्वेदिक उद्यान यांना भेटी दिल्या.