आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakare Visit Nashik City For Review Meeting

शहराचा सर्वांगीण विचार करा; राज यांचा नगरसेवकांना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेत सत्ता आल्यानंतर म्हणजेच गेल्या तीन वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून शहराचे रुपडे बदलण्यास सुरुवात झाली असून, बदललेले हे चित्र लोकांपर्यंत पोहोचवा.
नगरसेवकांनी केवळ आपल्या प्रभागापुरता विचार करता, आता शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून लोकांच्या मनावर केलेल्या विकासकामांची माहिती बिंबवा, असा सल्ला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
दरम्यान, या बैठकीस माजी महापाैर यतिन वाघ यांच्यासह तीन नगरसेवकांनी दांडी मारल्याने याबाबत मनसेच्या वर्तुळात चर्चा सुरू हाेती. राज हे रविवारी नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी शासकीय विश्रामगृहात नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही गेल्या तीन वर्षांत प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.
शहराच्या दृष्टीने अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, त्यांचे कामही प्रगतिपथावर आहे. खासगीकरणाच्या माध्यमातूनही अनेक प्रकल्प सुरू आहेत. नगरसेवकांनी आता फक्त प्रभागापुरता विचार करता शहराच्यादृष्टीने विचार करून केलेल्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या. सर्व रिंगरोडची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आता सर्व प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांचा विचार करून ही कामे मार्गी लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्हा संपर्कप्रमुखांकडून अाढावा; प्रभागांमध्ये बैठका सुरू

शहरात गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा सध्या मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांच्यासह पदाधिकारी घेत आहेत. त्यासाठी सर्व प्रभागांत बैठका घेतल्या जात असून, माहिती संकलित केली जात आहे. सिडको सातपूर विभागातील विकासकामांचा आढावा घेणे बाकी असून, लवकरच या विभागातील प्रभागांची माहिती संकलित केल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून राज ठाकरेंना सादर केला जाणार आहे.