आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांनी अखेर सोडला नाशिकचा नाद, सूचनाफलक ‘कृष्णकुंज’ कनेक्ट वेबसाइटही हवेतच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहेबपुढील आठवड्यात नक्की येणार, अहो दौरा नक्की होता मात्र अचानक बैठक लागली, अशा नानाविध सबबी देऊन सध्या मनसेचे पदाधिकारी वेळ मारून नेत असले तरी नाशिककरांचे मन जिंकण्यासाठी खास योजना जाहीर करणारे महिनाभरापूर्वी नाशिकवर लक्ष केंद्रित करून राज्यात भरारी घेण्याचे नियोजन करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकवर रुसल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच की काय, सध्या त्यांनी नाशिकचा नाद पूर्ण सोडला आहे.

मनसेतील टोकाची सुंदोपसुंदी माध्यमांकडून होणारी प्रश्नांची सरबत्ती यातून होणाऱ्या टीकाटिप्पणीमुळेही ते संत्रस्त असल्याचे सांगितेतले जाते. गरज पडली तर येथील पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून आढावा घेतला जात आहे.
३१ मे रोजी राज यांनी मुंबईतील जाहीर सभेत विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकताना स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे आखाड्यात उतरल्यास वेगळा परिणाम होईल, ही यामागील योजना लपून राहिली नाही. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असल्यामुळे त्यांनी लागलीच नाशिकवर लक्ष केंद्रित केले. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे झालेले पानिपत वाढती गटबाजी बघून त्यांनी मलमपट्टीसाठी विश्‍वासू अविनाश अभ्यंकर यांना पाठवले. त्यानंतर राज यांनी नाशिकला सलग तीन दौरे केले. गोदापार्कपासून तर पेलिकन पार्क, फाळके स्मारक, जॉगिंग ट्रॅक, शहर सुशोभीकरणासाठी आयलँड अशा झटपट नवनिर्माणासाठी पोषक कामांना सुरुवात केली. मात्र, ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली, त्यांच्यात स्थानिक नेत्यांमध्येच गटबाजीची ‘अभयंकर गितेते’ सुरू झाली. त्यातून स्थायीच्या सभापती निवडीतून राज यांच्या दौऱ्यातच बहिष्काराचा धक्कादायक अंक रंगला. बस्स, त्यावर तात्पुरते उपचार करून रवाना झालेले राज यांनी पुढे नाशिकचा विषयच डोक्यातून काढल्याचे समजते. त्यामुळेच की काय त्यांचे नियोजित दौरेही अचानक रद्द होत असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी टोक गाठत असून, त्या वादात पडण्यापेक्षा नाशिक सोडून अन्य जिल्ह्याकडेही त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे आता पदाधिकारी खासगीत सांगत आहेत.
नाशिकमधील सुंदोपसुंदी अशी
>दोनदिवसांपूर्वीच्या आमदार नितीन भोसले यांच्या कार्यक्रमाकडे ज्येष्ठ आमदार वसंत गितेते स्थायी समिती सभापती राहुल ढ‍िकले यांनी पाठ फिरवली.
>वसंत गितेते यांच्या आमदार निधीतील घंटागाडी लोकार्पण सोहळ्याला सभापती अ‍ॅड. राहुल ढ‍िकले गैरहजर राहिले.
>स्थायी समितीने मंजूर केलेल्या अग्निशामक साहित्य खरेदीच्या कामात गैरव्यवहार असल्याच्या आक्षेपावरून महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी हे काम बंद केले.