आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी राजांचा इतिहास समजावून घ्यावा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड-संभाजी राजांनी जीवनात नऊ वर्षांत 120 युद्धे जिंकलेली असतानाही बहुतांश इतिहासकारांनी त्यांना बदनाम केले आहे. त्यामुळे तरुणांनी संभाजी राजांचा इतिहास समजावून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. प्रकाश बर्डे यांनी केले.

संभाजी ब्रिगेडतर्फे चेहडी येथे गुणवंत व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या संस्थांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. जिल्हाप्रमुख योगेश निसाळ अध्यक्षस्थानी होते. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा माधुरी भदाणे, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी भीमराव सातपुते, भाऊसाहेब शिरोळे, राहुल बोराडे, नितीन टिळे, राजाभाऊ जाधव, गजानन चव्हाण, नामदेव सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. बर्डे म्हणाले की, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे. चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याची प्रेरणा इतिहासातून घ्यावी. योगेश मिसाळ यांनी, अशा गौरवामुळे सामाजिक कार्यासाठी मंडळांना ऊर्जा मिळेल, असे सांगितले. गजानन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.