आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raje Sambhaji Sports Stadium Development Issue Nashik

आठ कोटींच्या खर्चावर पाणी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - सिडकोतील अश्विननगर येथे आठ कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये पाणीगळती होऊ लागल्याने गुरुवारी जिल्हा रोलर स्केटिंगची स्पर्धा पाऊस सुरू असेपर्यंत चक्क बंद ठेवावी लागली. अखेरीस पाऊस थांबल्यानंतर आतील पाणी काढून स्पर्धा सुरू झाली. मात्र, निसरडेपणामुळे अनेक स्पर्धक घसरून दुखापतग्रस्त होण्याचे प्रकार घडले.

सिडकोवासीयांना भूषण ठरावे, असे क्रीडासंकुल अश्विननगर येथे सुमारे आठ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले. मात्र, या क्रीडासंकुलाची सध्या मोठी दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. अस्वच्छतेच्या आणि अवैध धंद्यांच्या विळख्यात सापडलेल्या या संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये आता पाणीगळती सुरू झाली आहे. गुरुवारी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेवर दुपारनंतर झालेल्या पावसामुळे पाणी फेरले जाते की काय, अशी परिस्थिती उद्भवली होती. परिणामी काही तास स्पर्धाच बंद ठेवावी लागली. त्यानंतर निसरड्या भागातच स्पर्धा पार पाडावी लागली. स्केटिंगमध्ये थोडे जरी संतुलन चुकले, तरी निसटून पडण्याची स्थिती अनेकदा येते. त्यात थोडेसेही पाणी असले, तरी स्पर्धक घसरून जखमी होण्याची शक्यता मोठी असते. मात्र, कुणालाच या प्रकाराचे गांभीर्य नसल्याने आयोजकांनी तशाच स्थितीत स्पर्धा पार पाडली. या प्रकारामुळे स्पर्धकांनी नाराजी व्यक्त केली.

स्पर्धेला दोन तासांचा ‘ब्रेक’
इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या गळतीमुळे सर्वच खेळाडूंना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही चांगले खेळाडू ओलसर जागेमुळे घसरून पडल्याने दुखापतगस्त झाले. पाऊस सुरू असेपर्यंत तब्बल दोन तास स्पर्धाच बंद ठेवण्यात आली होती. दीपक बलकवडे, स्पर्धकाचे पालक