आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘गोदावरी आपल्याला मातेसमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्या भावनेतूनच गोदामातेची सेवा करावी. या नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस उपाययोजनांच्या मागणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहावे,’ असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनी गुरुवारी केले.

के. एन. केला हायस्कूलमध्ये राजेंद्रसिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे. सिंहस्थात देशविदेशांतून लाखो भाविक येणार असल्याने नाशिक शहर व गोदावरी प्रदूषणमुक्त नसल्यास त्यांच्या मनात नाशिकची प्रतिकूल प्रतिमा निर्माण होऊ शकेल, असे मतही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.

सिमेंट काँक्रिटीकरणामुळे गोदावरीचे पावित्र्य भंग पावले आहे. कुंभमेळा काळात भाविकांनी शहराचे पावित्र्य राखावे, प्लास्टिक वापरावर बंदी घालावी, शासन व जनतेने प्रदूषण आणि पर्यावरणाच्या हानीबाबत मंथन करण्याचा सल्लही राजेंद्रसिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्राचार्य चैताली बिश्वास यांनी प्रास्तविक केले.
शहर का पानी नहर में, बारिश का नदी में
‘शहर का पानी नहर में और बारिश का पानी नदी में’ असा नवा संदेश देत डॉ. राजेंद्र सिंह यांनी गटारीचे व मलनिस्सारण केंद्राचे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यातच येऊ नये, अशी महत्त्वपूर्ण संकल्पना ‘दिव्य मराठी’च्या राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये मांडली. मलजल अथवा गटारीचे पाणी पाटबंधारे विभागाच्या कालव्यांमध्ये सोडून ते शेती आणि उद्योगांपर्यंत पोहोचविण्याचीही सूचना त्यांनी केली. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या कारभार्‍यांनीही या संकल्पनेचे स्वागत करीत धोरणात्मक निर्णयासाठी असा प्रस्ताव महासभेत सादर केला जाईल, असे सांगितले.