आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अागाऊ अारक्षण, लांबले राज्यराणीचे विस्तारीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - राज्यराणी एक्स्प्रेसमधून मनमाड ते कुर्लादरम्यान दरराेज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांच्या अागामी चार महिन्यांपर्यंतच्या अागाऊ अारक्षणामुळे ‘राज्यराणी’चा छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत धावण्याचा प्रवास साडेतीन महिन्यांनी लांबला अाहे. अाॅक्टाेबरपासून धावणारी राज्यराणी अाता नवीन वर्षात, २० जानेवारीपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत धावणार अाहे. राज्यराणी ‘सीएसटी’पर्यंत धावण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांचा यामुळे काहीसा हिरमाेड झाला अाहे. याप्रश्नी ताेडगा काढावा, यासाठी खासदार हेमंत गाेडसे मंगळवारी (दि. २९) रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार अाहेत.
मनमाड ते लाेकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत (कुर्ला) धावणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाला रेल्वेने २४ सप्टेंबर राेजी मंजुरी देऊन ही गाडी दि. अाॅक्टाेबरपासून ‘सीएसटी’पर्यंत धावणार असल्याचे जाहीर केले. ‘राज्यराणी’सह पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले. प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी खासदार गाेडसे यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण हाेत असल्याने अाॅक्टाेबरला ‘सीएसटी’पर्यंत धावणाऱ्या ‘राज्यराणी’च्या स्वागताची जय्यत तयारी प्रवासी करीत असतानाच रेल्वेने विस्तारीकरणाचा कार्यक्रम अाॅक्टाेबरएेवजी २० जानेवारीपर्यंत पुढे नेण्याचे संकेत दिले.

रेल्वेच्या चार महिने अगाेदर अारक्षणाच्या नियमानुसार १९ जानेवारी २०१६ पर्यंत जवळपास अडीचशेपेक्षा अधिक प्रवाशांनी कुर्लापर्यंतचे अागाऊ अारक्षण केले असल्याने २० जानेवारीपासून गाडी ‘सीएसटी’पर्यंत साेडणे नियमाने शक्य अाहे, अन्यथा यावर पर्याय शाेधावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

डाटा संकलन करताेय
रेल्वेच्या अारक्षण नियमानुसार चार महिन्यांचे अागाऊ अारक्षण केलेल्या प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना अारक्षण रद्द करण्याबाबत अाम्ही सुचवणार अाहाेत. रेल्वेच्या अारक्षण विभागाशी संपर्क साधून अारक्षण केलेल्या प्रवाशांचा डाटा संकलित केला जात अाहे. त्यामुळे विस्तारीकरण नियाेजित वेळेत हाेईल, असे वाटते. राजेशफाेकणे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य

अधिकाऱ्यांची भेट घेणार
^अागाऊ अारक्षण केलेल्या प्रवाशांना रेल्वेने सवलत द्यावी अथवा अन्य मार्ग शाेधून ‘राज्यराणी’च्या विस्तारीकरणातील तांत्रिक अडचण दूर करून अाॅक्टाेबर हाच मुहूर्त निश्चित करावा, यासाठी रेल्वे बाेर्डाच्या काेच विभागाचे संचालक नीरज वर्मा, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेऊन चर्चा करणार अाहे. हेमंतगाेडसे, खासदार