आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajyarani To CST Railway Express Strat From October

राज्यराणी पासून सीएसटीपर्यंत, विस्तारीकरणाला रेल्वेने मंजुरी दिली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- मनमाडते लाेकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत (कुर्ला) धावणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाला रेल्वेने मंजुरी दिली अाहे. अाॅक्टाेबरपासून राज्यराणी छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत (सीएसटी) धावणार अाहे. या निर्णयामुळे नाेकरदार, व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या पंचवटी एक्स्प्रेसवरील गर्दीचा ताण कमी हाेणार अाहे.
राज्यराणी एक्स्प्रेस सुरू झाल्यापासूनच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी साेयीची नसल्याने ही गाडी सीएसटीपर्यंत साेडण्याच्या मागणीसाठी अाग्रह हाेता. खासदार हेमंत गाेडसे यांनी अनेक वेळा पंचवटी राज्यराणी एक्स्प्रेसमधून केलेल्या प्रवासादरम्यान प्रवाशांनी वारंवार राज्यराणीच्या विस्तारीकरणाची मागणी केली हाेती. खासदार गाेडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन प्रयत्न केले. बाेर्डाच्या काेच विभागाचे संचालक नीरज वर्मा यांच्याशी वारंवार पाठपुराव्यानंतर गाडीच्या विस्तारीकरणातील अडथळा दूर हाेऊन गाडी दि. अाॅक्टाेबरपासून ‘सीएसटी’पर्यंत धावण्याचा मार्ग माेकळा झाला. यासाठी खासदार अरविंद सावंत, अामदार याेगेश घाेलप, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फाेकणे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. राज्यराणी कुर्ल्यापर्यंतच धावत असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकावर उतरून पुढचा प्रवास लाेकलने करावा लागत हाेता. गाडी बदलण्यात वेळ वाया जाऊन कामाच्या ठिकाणी पाेहचण्यास उशीर हाेत हाेता.

पंचवटी एक्स्प्रेसवरील भार हलका
जिल्ह्यासहशहरातील नाेकरदार, व्यावसायिक ‘सीएसटी’पर्यंत धावणाऱ्या ‘पंचवटी’ला प्राधान्य देत हाेते. राज्यराणीने जाणाऱ्या प्रवाशांना सीएसटीला जाण्यासाठी गाडी बदलावी लागत हाेती. त्यामुळे प्रवाशांचा वेळ पैशांचा अपव्यय हाेत हाेता. साहजिकच, ‘राज्यराणी’एेवजी पंचवटीला प्राधान्य िदले जात हाेते. अाता राज्यराणी सीएसटीपर्यंत धावणार असल्याने पंचवटीवरील भार अापाेअाप हलका हाेणार अाहे.

यापुढे अशी धावणार राज्यराणी...
राज्यराणीएक्स्प्रेसची सध्याचीच वेळ कायम ठेवून रेल्वे मंत्रालयाने विस्तारीकरणाला मंजुरी दिली. मनमाडहून सकाळी ५.२५ वाजता सुटून नाशिकराेडला ६.१३, देवळालीस ६.२३, इगतपुरीस ७.१५, कसाऱ्यास ७.४८, कल्याणला ८.४८ अाणि छत्रपती शिवाजी टर्मिनसवर (सीएसटी) १० वाजून चार किंवा पाच मिनिटांनी तर पाेहचणार अाहे. सध्याच्या वेळेनुसार राज्यराणी लाेकमान्य टिळक टर्मिनसवर (कुर्ला) सकाळी ९.५० वाजता पाेहाेचते.

..तर अडचण शक्य
राज्यराणीदि. अाॅक्टाेबरपासून कुर्ल्याएेवजी सीएसटीपर्यंत धावणार असल्याचे रेल्वेने घाेषित केले असले तरी प्रवाशांचे कुर्ल्यापर्यंत दि. ३० सप्टेंबर राेजीचे अारक्षण असल्यास अाॅक्टाेबरला गाडी कुर्ल्याएेवजी सीएसटीपर्यंत साेडण्यात अडचणीची शक्यता अाहे.

अानंद अाणि समाधान...
गेल्यावर्षभरापासून राज्यराणीच्या विस्तारीकरणाची अाग्रही मागणी हाेत हाेती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तांत्रिक अडचणीवर ताेडगा निघाला. राज्यराणी अाॅक्टाेबरपासून सीएसटीपर्यंत धावणार असल्याचे समजल्यावर सर्व नाशिककरांप्रमाणेच मलाही अानंद झाला. हेमंतगाेडसे, खासदार