आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैद्यांना राखी बांधून भगिनींनी जपली बांधिलकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- राखी पौर्णिमेनिमित्त आई सोशल फाउंडेशन महिला मंडळाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केली. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा सुलोचना बच्छाव, गौरी जाधव, संगीता भारमल व इतर महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
इंदिरानगर, राजीवनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी हास्ययोग क्लबच्या वतीने राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी परिसरातील रिक्षाचालकांना राख्या बांधून आगळा-वेगळा संदेश दिला.
विठ्ठल-रुक्मिणी हास्ययोग क्लब विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. समाजात रिक्षाचालकांबद्दल नेहमीच गैरसमज पसरत असतात. दिवसेंदिवस त्यांची प्रतिमा मलिन होत आहे. मात्र, त्यांनाही समाजाकडून आदर दिला गेला पाहिजे. तरच परिवर्तन घडू शकते, या उद्देशाने राजीवनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी हास्ययोग क्लबच्या वतीने रिक्षाचालकांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी त्यांना आपल्या परिसरातील महिला व युवतींसोबत बहिणीप्रमाणे वागणुकीचा सल्ला दिला. या वेळी प्रभागातील नगरसेवक सतीश सोनवणे, अर्चना जाधव, बी. आर. जोशी, सविता एरंडे, मालती मोरे, स्मिता जोशी, माधुरी बापट रुक्मिणी जाधव आदी उपस्थित होते.