आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. आर. पाटलांची पावले वाकडी, वादग्रस्त वक्तव्याचा राखी सावंतने घेतला समाचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘आबांची पावली वाकडी पडली आहेत. जो माणूस महिलांचे संरक्षण करू शकत नाही, त्यांच्याकडून महिलांनी काय अपेक्षा ठेवावी,’ अशा शब्दांत अभिनेत्री तथा रिपाइं महिला आघाडीची अध्यक्षा राखी सावंत हिने शनिवारी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत तिने राजकीय विषयावर आपली सडेतोड मतेही व्यक्त केली.

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी जाहीर सभेत आठवलेंची खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देताना राखी म्हणाले, ‘नक्कल करून मते मिळत नाहीत. त्यासाठी समाजसेवा करावी लागते. राज यांनी राजकारण सोडून सिनेमात काम करावे. त्यांना दोन चित्रपटांत काम देण्यासाठी मी स्वत: शिफारस करेल,’ असा टोला तिने लगावला.

रस्ते कॅटरिनासारखे चकाचक करीन
* भाजपच्या स्मृती इराणी आणि बसपच्या मायावती यांच्याप्रमाणे
मी ‘आरपीआयची राखी’.
* राज्यात सत्ता आल्यास रस्ते कॅटरिनासारखे चकचकीत करेन.
* मंत्रिपदाची संधी मिळाल्यास दलित, महिलांच्या संरक्षणास प्राधान्य देऊ.