आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Mandir Issue For Politics Says Chhagan Bhujbal

राम मंदिर हा केवळ निवडणुकीचा मुद्दा - छगन भुजबळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राम मंदिराचा मुद्दा देशात चर्चेला आला की समजायचं निवडणुकांची सुरूवात झाली म्हणून. या मुद्द्याचा वापर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठीच केला जात आहे, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी भाजप व संघ नेत्यांवर टीका केली.

भुजबळ म्हणाले की, भाजपचे सरकार केंद्रात असतानाही ते या मुद्द्यावर काहीच करू शकले नाहीत, तेव्हा आता काय करणार? आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप नेत्यांनी पुन्हा राममंदिराचा मुद्दा अजेंड्यावर आणला आहे. या प्रकरणात अनेक न्यायालयीन दावे असल्याने हा विषय खूपच क्लिष्ट बनला आहे. त्यामुळे हा विषय सर्वांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. दुर्देवाने तसे होताना दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.