आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईदच्या खरेदीसाठी फुलले बाजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान पर्व अंतिम टप्प्यात पोहोचले असून, ईदनिमित्तच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे.

बुधवारी (दि.८) रमजान महिन्यातील उपवासाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याला आता प्रारंभ झाला आहे. ‘अल्लाहची मानवजातीवर कृपा व्हावी, शहरात सुख-शांती नांदावी, संकटे दूर व्हावीत, पुरेसा पाऊस व्हावा', आदी याचनेसाठी शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठणानंतर मौन धारण करून प्रार्थना केली जात आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे कापड, टोप्या, सूट, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मुलांचे कपडे, बांगड्या, सुकामेवा, रंगीत शेवया, पठाणी ड्रेस, विविध खाद्यपदार्थ, खजूर आदींना मागणी वाढली आहे. काचेचे ग्लास कटोरे यांचे विविध आकर्षक प्रकार उपलब्ध आहेत. ईदनिमित्त रंगीबेरंगी शेवयांनाही मागणी वाढली आहे. मेंदी, बांगड्या, सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांतदेखील गर्दी होत आहे. मुलांच्या कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. पादत्राणांच्या दुकानांवरही गर्दी आहे.

सुकामेव्यालामागणी : रमजानईदला नवीन वस्तू वापरण्याची प्रथा असल्याने नवीन कपडे, शिरखुर्म्याचा सुकामेवा, शेवई, इस्लामी टोपी, नमाजसाठी कुर्ता-पायजमा, सुरमा, अत्तर, मेंदी, बांगड्या, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने या वस्तूंची दुकाने फुलू लागली आहेत. बदाम, खोबरे, खजूर, चारोळी, काजू, पिस्ता, किसमिसला मोठी मागणी आहे.

‘शब-ए-कद्र' च्या पर्वाला विशेष महत्त्व मंगळवारी‘शब-ए-कद्र' असल्याने सधन मुस्लिम बांधवांकडून गोरगरिबांना जकात वाटली जाते. रोख रकमेच्या अथवा दागिन्यांच्या िकंमतीच्या अडीच टक्केप्रमाणे जकात काढून ती गोरगरीब लोकांना वर्षातून एकदा वाटप अनिवार्य असते. अन्य महिन्यापेक्षा रमजानमधील दानाला सत्तरपटीने अधिक महत्त्व असल्याची श्रद्धा आहे.