आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंभात रामदेवबाबांसह प्रमुख महाराजांची हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रख्यातयोगगुरू बाबा रामदेव यांच्यासह लाखोंच्या संख्येने अनुयायी असणारे विविध धार्मिक, आध्यात्मिक साधू- महंत येत्या आठवडाभरात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे कुंभनगरीच्या आध्यात्मिक वातावरणात अधिकच भर पडणार आहे.
योगगुरू रामदेव बाबा हे दि. १८ सप्टेंबरला दाखल होणार आहेत. त्यांचा मुक्काम त्र्यंबकेश्वरला गुरुशरणमहाराज यांच्याकडे २३ सप्टेंबरपर्यंत राहणार असून, या काळात त्यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रामदेवबाबांकडून नाशिकच्या कुंभमेळ्यासही भेट देण्यात येणार आहे. पहिली शाही पर्वणी पार पडल्यानंतर आता साधू-महंतांसह भाविकांना दुसऱ्या शाही पर्वणीचे वेध लागले आहे.

सत‌्पाल महाराज यांचेही आगमन
नाशिकमधीलमारुती वेफर्सनजीकच्या डोममध्ये मानव उत्थान सेवा समितीचे प्रमुख सत‌्पाल महाराज यांच्या सदभावना संमेलनास ११ सप्टेंबरपासून प्रारंभ होर आहे. त्यात त्यांचे तीन दिवस दररोज प्रवचन होणार आहे.