आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकुंड स्वच्छता: नऊ ट्रॅक्टर निर्माल्य, गाळ काढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -रामकुंडपरिसरात मंगळवारी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यात नऊ ट्रॅक्टर निर्माल्य, कपडे आणि गाळ काढण्यात आला. आरोग्य, तसेच बांधकाम विभागाचे चाळीस कर्मचारी या िवशेष स्वच्छता मोहिमेत सहभाग झाले होते.
शहरात डो के वर काढू लागलेल्या डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रामकुंडातील पाण्याला उग्र दर्प येत असल्याने रामकुंड परिसरात स्वच्छता करण्यात आली. दुपारी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. यात आरोग्य, बांधकाम विभागाच्या जवळपास चाळीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. ही मोहीम यापुढेही नियमितपणे सुरूच राहणार असल्याचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी सांगितले. भाविकांनी या मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले आहे.