आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawale News In Marathi, Raju Shetty, Mahadev Jankar

शेट्टी, जानकरांमुळे आमची अडचण, रिपाइं खासदार रामदास आठवले यांची भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘महायुतीत भाजप-शिवसेना आणि रिपाइं असती तरीही सरकार येणारच होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांची आवश्यकता नव्हती. तरीही ते आले, त्यांचं स्वागत आहे. परंतु त्यांच्यामुळे आमची अडचण झाली. आम्हाला दोन जागा कमी मिळाल्या,’ अशी खंत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी व्यक्त केली.


नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिन सोहळा पार पडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, या पक्षांना महायुतीत घेऊन भाजप-सेनेची अडचण झाली तरीही त्यांनी आमची अडचण करावयाला नको होती. आता कुठलीही बोलणी केवळ तोंडी न करता लेखी करार करणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रात सत्ता आल्यास कॅबिनेट मंत्रिपद आणि राज्यात नेमके काय देणार, याचे स्पष्ट आश्वासन घेणार असल्याचे ते म्हणाले.