आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांबरोबर आठवलेंचे चहापान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देत महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांनी सोमवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील राजकीय हवा चांगलीच तापवली. मुंबईवरून नाशिकच्या शासकीय विर्शामगृहाकडे येताना खासदार समीर भुजबळ यांच्या आवतनाने त्यांनी थेट भुजबळ फार्म गाठले. चहापानानंतर भुजबळांच्याच गाडीत नाशिकरोड येथील नियोजीत कार्यक्रमस्थळाकडे गेल्याने चर्चांना उधाण आले होते.
ऐरवी भाषणातून मिश्कीली करणार्‍या आठवले यांचा हात कोणी धरत नाही. मात्र सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी कृतीद्वारे केलेल्या मिश्कीलीमुळे राजकीय गोटात खळबळ उडाली. सकाळी मुंबईवरून निघाल्यावर आठवले नाशिकला येणार होते. येथून शिवसेना नेते रामदास कदम यांच्याबरोबर ते कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र अचानक पालकमंत्री छगन भुजबळ हे चहा पिण्यासाठी थांबले आहेत असा निरोप त्यांना मिळाला. लागलीच त्यांचा ताफा इंदिरानगरजवळील महामार्गावरून भुजबळ फार्मच्या दिशेने निघाला.