आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकुंडात पिंड टाकणाऱ्यांवर होणार फाैजदारी कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रामकुंडाच्या दयनीय अवस्थेचे चित्र माध्यमांनी उघड केल्यानंतर जाग अालेल्या महापालिकेने अाता रामकुंडातील पाण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. महापाैर अशाेक मुर्तडक यांनी गुरुवारी (दि. ७) प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत रामकुंडासह लक्ष्मणकुंडाच्या स्थितीची पाहणी करून तेथील गाळ हटविण्याच्या कामाला गती देण्याचे अादेश दिले. त्याचप्रमाणे रामकुंडात दहाव्याचे पिंड टाकणाऱ्यांवर फाैजदारी कारवाई करण्याचे अादेशदेखील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. रामकुंडात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अासपासच्या विहिरींचे पाणी घेण्यासह टँकरचालकांना अावाहन करण्यात येणार असून, हाेळकर पुलाच्या पुढील भागातील कुंडात बाेअर घेण्याच्या पर्यायांची अंंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रामकुंडावर येणाऱ्या भाविक पर्यटकांनी, तसेच माध्यमांनी गत अाठवड्यापासून काेरड्याठाक पडलेल्या रामकुंडाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त सातत्याने प्रसिद्ध हाेऊ लागल्यानंतर महापालिका अाणि प्रशासनाकडून या प्रश्नाची दखल घेण्यास गुरुवारपासून प्रारंभ झाला. महापाैर अशाेक मुर्तडक यांनी गुरुवारी दुपारी रामकुंड अाणि लक्ष्मणकुंडावर जाऊन तेथील विदारक परिस्थितीची पाहणी केली. तसेच, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून दाेन्ही कुंडांच्या पूर्ण सफाईचे अादेश दिले. लक्ष्मणकुंडात प्रचंड प्रमाणात गाळ साचलेला असून, तेथे जेसीबी, राेबाेट लावून, तसेच कामगारांच्या हातून त्वरित स्वच्छता अभियान छेडण्याचे अादेश त्यांनी दिले. तासभर थांबून सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना काम नीट केल्यास हातात फावडे घेऊन अापण स्वत:च कामाला उतरू, असा इशारादेखील त्यांनी दिला.

अासपासच्याविहिरींसह टँकरचा पर्याय : रामकुंडाच्याअासपास ज्या विहिरी अाहेत, त्यांचे पाणी उपसून रामकुंडात अाणण्याच्या पर्यायाचा विचार केला जाणार अाहे. संबंधित व्यक्तींकडून कसा प्रतिसाद मिळताे, यावर ताे निर्णय अवलंबून राहणार अाहे. तसेच, महानगरातील प्रत्येक टँकरमालकाला विनंती करून प्रत्येक टँकरमधून त्यांच्या-त्यांच्या भागातील विहिरींचे पाणी अाणून रामकुंडात साेडण्याचे अावाहन केले जाणार अाहे. अशाप्रकारे किमान ५०० ते ६०० टँकरद्वारे पाणी अाणून रामकुंडात साेडले, तरी साडेतीन ते चार लाख लिटर पाणी उपलब्ध हाेऊ शकणार असून, किमान काही काळापुरता हा प्रश्न मार्गी लागू शकणार असल्याचे महापाैर अशाेक मुर्तडक यांनी नमूद केले.

हाेळकरपुलानजीकच्या कुंडात बाेअर : यापर्यायांबराेबरच हाेळकर पुलानजीकच्या कुंडात बाेअर घेतल्यास तेथे हमखास चांगल्या प्रमाणात पाणी लागणार असल्याचे चर्चेअंती निष्पन्न झाले अाहे. त्यामुळे या पर्यायाचाही अवलंब करून रामकुंडात स्वच्छ पाणी राहील, अशी व्यवस्था करण्याचा विचार असल्याचेही महापाैरांनी या वेळी नमूद केले. या वेळी त्यांच्यासमवेत यू. बी. पवार, तसेच विभागीय अधिकारी पगार अाणि अन्य मान्यवर उपस्थित हाेते.

छायाचित्रे काढून कारवाई
रामकुंडाच्या पात्रात अद्यापही भाविक उभे राहून वाहून येणारे पाणी अंगावर शिंपडून घेत अाहेत. अशा परिस्थितीत किमान भाताच्या पिंडाचे गाेळे तरी रामकुंड किंवा लक्ष्मणकुंडाच्या पाण्यात टाकले जाऊ नयेत. अन्यथा, असे गाेळे टाकणाऱ्यांची छायाचित्रे काढून घेऊन त्यांच्यावर फाैजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे अादेश रामकुंड परिसरात तैनात अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांना देण्यात अाले असल्याचे महापाैरांनी या वेळी नमूद केले.


महापालिकेत २८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची गुढी