आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगारंग महोत्सव: नृत्य-गायन,पुरस्कार वितरणाने सॅव्ही वूमेन्स फेस्टची सांगता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नव्या-जुन्या गाण्यांचे दमदार बीट्स... थिरकायला लावणारे तरुणाईचे नृत्य गायनाचा परफॉर्मन्स... रॅम्पवर सादर होणारे एकाहून एक सरस वॉक आणि उत्साहाने भारलेलं वातावरण... अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी सॅव्ही वूमेन्स फेस्टची सांगता झाली.
सॅव्ही कॉलेज ऑफ फॅशन, ज्वेलरी आणि मास मीडिया यांच्यातर्फे दादासाहेब गायकवाड सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यादरम्यान विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांनाही या वेळी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यानिमित्ताने नाशिककरांना फॅशन शोसह विविध परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळाली होती. त्यात कीर्ती भवाळकर ग्रुपतर्फे सादर करण्यात आलेले कथक नृत्य, दसककर सिस्टर्सचे स्त्रीभ्रूणहत्या विषयावर आधारित क्लासिकल गायन, वंदे मातरम््वर आधारित सादरीकरणालाही रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली.
रॅम्पवर सादर झालेल्या ट्रायबल फ्युचरिस्टिक थीमवर आधारित फॅशन शो खऱ्या अर्थाने रंगारंग ठरला. त्यात कुंभमेळा थीमवर आधारित रॅम्पवॉक लक्षवेधी ठरला. रुद्राक्षांचा केलेला अप्रतिम वापर, कपड्यांमधील भगव्या रंगाच्या छटा, त्याला साजेशी केशरचना हे सारेच या थीमनुसार असल्याने, या परफॉर्मन्सने नाशिकच्या संस्कृतीची आठवण झाली. त्यानंतर करण वेदांती या चिमुकल्यांचे दादा कोंडके यांच्या गाण्यांवर ट्रीब्यूट डान्स, बॉलीवूडच्या गाण्यांचे सादरीकरण, रॉक स्टार ग्रुप जेम्स ग्रुप यांचे रोबोटिक डान्स, गुरुज् ग्रुपचा वेस्टर्न डान्स, इंग्रजी मराठी भाषेतून टॅलेंट हंट स्पर्धेतील निवडलेल्या स्पर्धकांच्या गाण्यांचे सादरीकरण आणि मिस सॅव्ही नाशिक मिसेस सॅव्ही नाशिक यांची अंतिम फेरी अशा भरगच्च कार्यक्रमांमुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला.
स्पर्धांच्या परीक्षणासाठी प्रसिद्ध अँकर रोहण मेहता, कोरिओग्राफर अभिषेक जोशी अभिनेता प्रीतम जुंद्रे, जगदीश कुलकर्णी, राधिका ठोसर, वोगाटी मॉडेलिंग स्कूलचे सागर बैरागी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, हे सारे भरगच्च कार्यक्रम पाहण्यासाठी नाशिककरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. विविध परफॉर्मन्स, मान्यवरांचे मनोगत असा हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.

यांचा झाला गौरव-

आमदार देवयानी फरांदे, सामाजिक कार्य
कीर्ती भवाळकर नृत्य
मृण्मयी कोलवलकर अभिनय
दसककर सिस्टर्स गायन
अमृता जैन यंग आंत्रप्रिनर
कोमल देशमुख खेळाडू
रविना परमार कॉस्मेटॉलॉजिस्ट