आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजाननिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण; खुशियों की सौगात लाती है ईद...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रमजाननिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी इफ्तार पार्टी, नमाज पठण सुरू आहे. तसेच बांधव विविध खरेदीही करत असून, बाजारपेठाही गजबजल्या आहेत. शहरातील दाऊदी बोहरा समाज बांधवांतर्फे सोमवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सर्वांना सुख-शांती व समृद्धी मिळू दे, अशी प्रार्थना करत ईदच्या महिन्यात जे पवित्र राखले ते इतर महिन्यातही राखले जावे, असा संकल्प नमाज पठनातून करण्यात आला.
द्वारका येथील कुतबी मशिदीत सकाळी मौलाना जनाब युसूफभाई साहब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मेनरोड येथील बोहोरपट्टी परिसरातील जैनी मशिदीत जनाब शेख नुरोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा करण्यात आला. या वेळी जनाब युसूफभाई यांनी रमजानचे महत्त्व सांगितले. इतर अकरा महिनेही चांगली वर्तणूक करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. समाज बांधवांनी शिरखुर्म्याचा कार्यक्रम आप्त, स्वकीय, मित्रांसाठी घेतला होता.

सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छांचा वर्षाव
रमजान ईदनिमित्त बोहरा बांधवांनी इतर बांधवांवर व्हॉट्स-अप, एसएमएस, ई-मेलद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच सोमवारी दिवसभर व्हॉट्स-अप ग्रुपवर एकमेकांना शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरूच होती.