आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्र नव्हे.. रांगोळीचे रेखाटन! तारांगण येथे रांगोळी प्रदर्शनाला सुरुवात; उत्स्फूर्त प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एखाच्या चित्रकाराच्या कुंचल्यातून सर्रकन एखादी रेषा उमटावी, त्यात रंगकाम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र निर्माण व्हावे, हा अनुभव अापण अनेकदा घेताे. पण, त्याच चित्रकाराच्या जागी जर रांगाेळीकार असेल तर! ही गाेष्ट अशक्य वाटते ना? पण ते बडोद्याचे ज्येष्ठ रांगोळीकार अनंत मोरे यांनी शक्य करून दाखिवले अाहे.
त्यांच्या दहाव्या व्यक्तिचित्र रांगोळी प्रदर्शनाचे उद‌्घाटन तारांगण येथे बुधवारी (दि. २७) जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते झाले.२७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी सुरू राहाणार आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे गुजरातचे चित्रकार असून, त्यांचे महाराष्ट्रात दहावे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपतीच्या विविध छटांच्या रांगाेळ्या त्यांनी रेखाटल्या अाहेत.
रसिकांची नजर , खिळते ती व्यक्तिचित्रांकडे. माधुरी दीिक्षत, अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, वसंत पवार यांची रांगाेळ्या तर हुबेहूब वाटतात. असे वाटते की एखादे पाेट्रेट काढूनच जमिनीवर अांथरले अाहे. प्रत्येकजण ते बघताना प्रथम हे चित्र अाहे की, खराेखरीच रांगाेळी अाहे याची खात्री करून घेणारच. या रंगकामात माेरे यांनी प्रचंड बारकावे जपल्याचे दिसून येते. माेरे केवळ एकदा व्यक्तीचा चेहरा लक्षात घेतात अािण त्याची हुबेहूब प्रतिकृती रेखाटतात.
तारांगण येथे सुरू असलेल्या अनंत माेरे यांच्या व्यक्तिचित्र रांगाेळी प्रदर्शनाचे उद‌्घाटन जिल्हािधकारी विलास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनीही चित्र पाहण्याचा अानंद घेतला. सर्व छाया : विवेक बोकिल
पुढील स्‍लाइडवर पाहा, रांगोळीत साकारलेली छायाचित्रे