आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरपदी भानसी तर उपमहापाैरपदी गिते बिनविराेध, महापालिकेत प्रथमच बिनविराेध निवडणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजपला १२२ जागांपैकी ६६ जागा मिळाल्यानंतर जनतेने दिलेल्या स्पष्ट बहुमताच्या काैलाचा अादर करीत महापाैरपदावर रंजना भानसी, तर उपमहापाैरपदासाठी प्रथमेश गिते यांची अविराेध निवड करण्यात अाली. कणखर विराेधी पक्षाची भूमिका बजावू, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत महापाैर व उपमहापाैरपदासाठी काँग्रेस अाघाडीने माघार घेतल्यानंतर पालिकेच्या इतिहासात प्रथमच अविराेध निवडणूक झाली.
 
महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक कार्यकाळातील महापाैर व उपमहापाैरपदासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. महापाैरपदासाठी भाजपच्या रंजना भानसी, तर काँग्रेसकडून अाशा तडवी या उमेदवार हाेत्या. उपमहापाैरपदासाठी प्रथमेश गिते हे भाजपकडून, तर त्यांच्याविराेधात राष्ट्रवादीकडून सुषमा पगारे यांना उमेदवारी दिली हाेती. विजयासाठी मॅजिक फिगर ६२ असून, भाजपकडे ६६ जागा असल्यामुळे स्पष्ट बहुमताच्या अाधारावर त्यांचाच महापाैर व उपमहापाैर हाेईल, हेही स्पष्ट हाेते.
 
अशी झाली अविराेध निवडणूक
महापाैरपद, उपमहापाैरपदासाठी दुरंगी लढत असली तरी भाजपचाच वरचष्मा हाेता. मात्र, उगाच सभागृहाचा वेळ जाऊ नये व स्पष्ट बहुमताच्या काैलाचा अादर राखण्यासाठी भाजप गटनेते संभाजी माेरूस्कर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, मनसे गटनेते सलीम शेख, महापाैर अशाेक मुर्तडक, उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी सभागृहाबाहेर जाऊन चर्चा केली. त्यानंतर रंजना भानसी यांनी काँग्रेसच्या अाशा तडवी यांना अर्ज माघारीची विनंती केली. त्याचप्रमाणे प्रथमेश गिते यांनी सुषमा पगारे यांना अर्ज माघारीबाबत विनंती केली. यावेळी काँग्रेसचे राहुल दिवे यांनीही मध्यस्थी केली. तडवी गिते यांनी माघार घेतल्यानंतर मात्र भानसी गिते यांच्या निवडीचा मार्ग माेकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी काम बघितले. 
 
अादिवासी समाजाला प्रथमच लाल दिवा : महापाैरपदाचा लाल दिवा भानसी यांच्या रूपाने प्रथमच अादिवासी समाजाला मिळाला. यापूर्वी अादिवासी समाजासाठी महापाैरपद अारक्षित नसल्यामुळे लाल दिव्याचा मान मिळू शकला नव्हता. प्रामुख्याने सर्वसाधारण अाेबीसी याच संवर्गासाठी हे पद अधिकाधिक काळ अारक्षित हाेते. 
 
अर्धे सभागृह भाजपमय : सकाळी११ वाजता महापाैर, उपमहापाैर निवडीची प्रक्रिया झाल्यानंतर भाजपचे एकापाठाेपाठ एक नगरसेवक सभागृहात दाखल झाले. त्यानंतर सभागृहाच्या डाव्या बाजूच्या काेपऱ्यात सत्ताधारी नगरसेवक बसू लागले. डाव्या बाजूला साधारण ६० खुर्च्या असल्यामुळे सभागृहाचा एक काेपरा भाजप नगरसेवकांनी भरून गेला. महासभा सभागृहाच्या अखेरच्या ज्या रांगेत सर्वसाधारणपणे पत्रकार अधिकारी बसतात तेथेही भाजप नगरसेवकांना बसावे लागेल. इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे असे चित्र हाेतेे. 
 
दिवंगत नेत्यांची अाठवण भानसी गहिवरल्या 
महापाैरपदाच्याखुर्चीत बसल्यानंतर भानसी यांना ज्येष्ठांचे बाेट पकडून राजकारणात अाल्याची अाठवण सांगताना अश्रू अनावर झाले. माजी खासदार तथा वडील स्व. कचरूभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाने राजकारण बघितले. मात्र, खरी पकड मिळवून दिली भाजपचे दिवंगत नेते बंडाेपंत जाेशी यांनी. चूल अाणि मूल यात रमता त्यांनी तिकीट दिले. त्यानंतर भाजपची निष्ठावंत म्हणून अाजपर्यंत प्रवास केला. स्व. वडनेरे, डाॅ. अाहेर यांनी दिलेल्या पाठबळाच्या अाठवणी सांगताना त्यांचे डाेळे पाणावले. 

पारदर्शक कारभार करणार
केंद्र व राज्याप्रमाणे महापालिकेचा कारभार पारदर्शक असेल. स्वच्छ व सुंदर नाशिक करताना नगरसेवकांना साेबत घेऊन वाटचाल करू. उत्पन्नाचे स्रोत वाढवून शहर स्मार्ट करणार - रंजना भानसी, महापाैर

भयमुक्त नाशिक करणार
शहरात मूलभूत सुविधांबराेबरच भयमुक्त नाशिकसाठी प्रयत्न असतील. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबराेबरच शहर स्वच्छ व सुंदर करणार. एकत्रित विकासाचा प्रयत्न असेल - प्रथमेश गिते, उपमहापाैर
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, नाशिकमधील भाजपचा विजयोत्‍सव... 
बातम्या आणखी आहेत...