आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटीची खंडणी मागणारे मोकाट, कातड विरोधात गुन्ह्यांची मालिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गायरान जमिनीत गैरव्यवहार झाल्याची धमकी देत बांधकाम व्यावसायिकाकडे काेटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत पंडीत कातड, आणि इतर पाचही जण चार दिवस उलटूनही पाेलिसांच्या हाती लागलेले नाही. संशयितांच्या शाेधासाठी वेगवेगळी पथके नियुक्त करण्यात आलेली असली तरी संशयित अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संशयित पंडित कातड याच्याविरुद्ध आतापर्यंत किमान वेगवेगळे ११ गुन्हे दाखल असल्याची जंत्रीच तक्रारदाराने पाेलिसांकडे सादर केली आहे.

उंटवाडीतील रहिवासी अर्जुन खेतवानी यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी मातोरी शिवारातील १८७ एकर गायरान जमीन सन २०१३ मध्ये खरेदी केली. यासाठी कायदेशीर प्रक्रिया याेग्य पद्धतीने पार पडलेली असतानाही संशयित पंडीत रंगनाथ कातड, रामदास पिंगळ, मोतीराम ढेरिंगे यांनी यापूर्वीच ही जमीन विक्री झालेली असताना बनावट कागदपत्रांद्वारे हा व्यवहार केल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. प्रकरण मिटवण्यासाठी आणि जमिनीचा अधिक मोबदला मिळवण्यासाठी कातड त्याच्या साथीदारांनी खेतवानी यांच्याकडे एक कोटीची मागणी केली. संशयितांनी धमक्या देणे सुरू केल्याने खेतवाणी यांनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी चऔकशीअंती कातड यांच्यासह पाचही जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.