आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे कराल तर जबाबदार ठराल - राहुल ढिकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील खड्ड्यांची मंगळवारी प्रातिनिधिक पाहणी केल्यानंतर स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांनी ‘खड्डे कराल तर त्यासाठी जबाबदार व कारवाईसाठी पात्र ठराल’, अशा भाषेत ठेकेदारांना तंबी दिली. पावसाळा संपेपर्यंत खड्डा झाल्यावर तत्काळ भरलाच पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.

‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या ‘रस्त्यांचा राखतील आब ‘दिव्य मराठी’चे किताब’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर काही भागात केलेल्या पाहणीनंतर ते म्हणाले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत.
गेल्या कुंभमेळ्यात तयार केलेल्या काही रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. अशा परिस्थितीत खड्डे बुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिका-यांना सूचना दिल्या असून, रोज रस्त्यांचा आढावा घेऊन खड्डा दिसल्यास मुरूम टाकून त्वरित भरण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठेकेदारांनाही रस्त्यांचा दर्जा चांगला ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, त्याकडे दुर्लक्ष करणा-यांवर यापुढे कारवाई होणार आहे.