आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक होरपळत असतानाच मंगळवारी रात्री दोन महिलांवर बलात्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - जाळपोळीच्या घटनांनी नाशिक होरपळत असतानाच मंगळवारी रात्री दोन महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्याने शहराची सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना सामान्य नाशिककर व्यक्त करीत आहेत. महानुभाव पंथाची दीक्षा घेतलेल्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आला असून, दुस-या घटनेत बंगल्यात एकटी राहत असलेल्या महिलेला दोघांनी गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आहे. लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
माडसांगवी येथील महानुभाव पंथाची दीक्षा घेतलेली तीस वर्षीय (तपस्विनी) महिला रात्री 10 च्या सुमारास घराकडे जात होती. या वेळी नाशिकहून निफाडकडे जाणा-या सुभाष सोमनाथ खालकर ऊर्फ पप्पू (रा. नागापूर) यांनी या महिलेला माडसांगवीला सोडतो, असे सांगून दुचाकीवर बसविले. परंतु, माडसांगवी टोलनाक्याहून पुढे गेल्यावर त्याने या महिलेला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांना गस्त घालताना ही महिला आढळल्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयितास ताब्यात घेतले. आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दुस-या घटनेत बंगल्यात पाच वर्षीय मुलासह एकटी राहत असलेल्या 32 वर्षीय महिलेवर दोघांनी बलात्कार केला. मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास संबंधित महिलेचा मुलगा आजीबरोबर सातपूरला गेला होता. याच दरम्यान दोघे काळे बुरखे बांधून घरात घुसले व महिलेला धाक दाखवून त्यांनी बलात्कार केला. या महिलेचा पती चंद्रशेखर भालेराव आखातातील बहारीन येथे नोकरीस असून, त्याने दोन वर्षांपूर्वी या महिलेशी घटस्फोट घेतला असून, एका चिनी महिलेशी त्याने विवाह केला होता. दरम्यान, ही महिलाही त्याला सोडून गेली आहे. अत्याचारग्रस्त महिला पतीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. बंगला खाली करण्यासाठी पती नेहमीच दबाव टाकत असून, त्यानेच गुंड पाठवून हा प्रकार केला असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. सहायक आयुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत महाजन तपास करीत आहेत. अत्याचारग्रस्त महिलेचे वारसपत्रावर नाव असल्याने बदनाम करण्यासाठी पतीनेच हा प्रकार घडवून आणला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.