आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता-पित्याच्या खुनाची धमकी देत बालिकेवर बलात्कार, सिद्धार्थनगर परिसरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत १३ वर्षीय मुलीला घरी बोलावत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ९) सिद्धार्थनगरमध्ये घडला. कुटुंबियांच्‍या सुरक्षेसाठी हे कुणालाही सांगणाऱ्या मुलीला त्रास झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी गुरुवारी (दि. १४) मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी येथील कुटुंब उदरनिर्वाहासाठी शहरात आले आहे. पीडित मुलीचे वडील दिवसा मजुरी आणि रात्री सोयायटीमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतात. शनिवारी पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी सिद्धार्थनगर बस स्टॉपवर उभी असताना संशयित किरण इप्पर याने जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसवत त्याच्या घरी नेले. चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला काही सांगितले आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्या घटनेला पाच-सहा दिवस झाल्यानंतर पीडित मुलीला त्रास होत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यावर कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक सुनील नंदवाळकर तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...