आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीस नेले पळवून मंदिरात लग्नाचे नाटक करुन तिच्यासोबत केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/सटाणा- महड (ता.बागलाण) येथील 17 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीस फुस लावून, पळवून नेऊन लग्न करणाऱ्या व वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणास व त्याला मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घरातील व गल्लीतील लोक शेतीकामासाठी गेले असता आरोपी ललित उर्फ सोन्या सुरेश पवार (रा.महड, ता.बागलाण) याने पीडितेशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले. पीडितेच्या अज्ञातपणाचा गैरफायदा घेत तिला दोधेश्वर (ता. बागलाण) येथील मंदिरात घेऊन जाऊन वरचे टेंभे, (ता. बागलाण) येथील दोन साक्षीदारांच्या मदतीने मंदिरात माळा घालून लग्न लावून घेतले. यानंतर पीडितेवर आरोपीने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे.
 
या तक्रारीवरून आरोपीस मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी आधीच ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य आरोपी पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. दरम्यान आरोपी आघार (ता.मालेगाव) येथे दडून बसल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी सापळा रचून काही तासातच त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 376 (2), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम सन 2015 चे कलम (1) चे उपकलम (डब्ल्यू) सह 3 (2) चे उल्लंघन उपकलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलिस आधिकारी ए. बी. हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...