आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह, सेक्स-धोका : फेसबुकवर मैत्रीनंतर बलात्कार, व्हिडीओ शूट करून मुलीच्या आईलाही धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
सिडको - सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झालेल्या शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करून तिची बदनामी करण्याचा प्रकार सिडकाेत उघडकीस आला आहे. याबाबत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरात सोशल मीडियावर मैत्री करत शाळकरी मुलीवर वेळोवेळी बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१७ पर्यंत फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर काढलेले छायाचित्र काढून शारीरिक संबंध ठेवल्यास तुझ्या घरच्यांना हे छायाचित्र चित्रीकरण दाखवेन, अशी धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे पीडित मुलीने सांगितले. मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने मुलास याबाबत विचारणा केली असता त्याने मुलीच्या आईस शिवीगाळ केली. याप्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर अंबड पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पुष्पा निमसे करत आहे. 
 
काही महिन्यांपूर्वी सिडकाे परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनीसाेबत असाच प्रकार घडला हाेता. व्हाॅटस‌्अॅपद्वारे मित्र-मैत्रिणींचा ग्रुप तयार करून त्यामाध्यमातून निर्माण झालेल्या जवळकीचा फायदा घेत यातील संशयिताने संबंधित विद्यार्थिनीवर वारंवार अतिप्रसंग केला हाेता. 
 
साेशल मीडियाचा गैरवापर वाढला 
फेसबुक, व्हाॅट‌्सअॅप या साेशल मीडियातील माध्यमांचा वापर करत मुली महिलांचा लैंगिक छळ करण्याच्या प्रकारांत वाढ झाली अाहे. यामध्ये मैत्रीचे जाळे विणत काढलेले फाेटाे चित्रफित यांचा ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जाताे. यातून पैसे उकळण्याबराेबर शारीरिक संबंधांची मागणी केली जाते. ही बाब असह्य झाल्यानंतर पीडित महिला मुली पाेलिसांकडे धाव घेतात. परंतु, साेशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करताना काळजी घ्यावी, असे सायबर पाेलिसांकडून वारंवार बजावण्यात येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी अापले फाेटाे या माध्यमांवर टाकू नयेत, तसेच या माध्यमाद्वारे मैत्री जपून करावी. 
बातम्या आणखी आहेत...