आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या चुलत बहिणीवरच केला आत्याचार, किचनमध्ये जाऊन केले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवळा- उमराणे येथे एका तरुणाने आपल्या चुलतबहिणीवरच अतिप्रसंग केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली अाहे. पोलिस ठाण्यात संशयितावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमराणे येथील १९ वर्षीय तरुणी आईवडिलांसह शेतात राहते. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या तरुणीचा चुलतभाऊ घरी येऊन आमच्या मळ्यातील कांदे काढायचे आहेत असे सांगून तिला शेतात घेऊन गेला. थाेड्यावेळातच त्याचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्याने तरुणीस पाणी अाणण्यासाठी घरात पाठविले. त्यानंतर ती पाणी अाणण्यास गेली असता त्याने घरता जाऊन तिला धमकी देत अत्याचार केला. दुसऱ्यांना सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. पीडित तरुणीने आईला ही घटना सांगितली. त्यांनी तत्काळ देवळा पोलिस ठाण्यात येऊन आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. संबंधित पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून देवळा पोलिसांनी अाराेपीस ताब्यात घेतले अाहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...