आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षीय विद्यार्थिनीस चॉकलेटचे आमिष दाखवत अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - एकापाच वर्षीय विद्यार्थिनीस चॉकलेटचे आमिष दाखवत शालेय वाहन चालकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर येथील स्वप्नील किशोर जुन्नरे (वय ३०) याने चॉकलेटचे आमिष दाखवत या मुलीवर कृषीनगर जॉगिंग ट्रॅक येथे अत्याचार केला. मुलीने आईकडे सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संशयितास पोलिसांनी तात्काळ अटक करून चौकशी केली असता काही मुलींना चॉकलेटचे आमिष देत तो असाच अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक सरिता जाधव तपास करत आहेत.